उपनिरीक्षक दिलीप चौरे यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान !

0

पैठण,दिं.१३: एस आय डी सी पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांना पोलीस दलात उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान.

    पोलीस दलात उल्लेखनीय सेवेसाठी दिले जाणारे राष्ट्रपतींचे पोलीस पदक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी राजभवन मुंबई येथे  दिलीप राधाकिसन चौरे (पोलीस उपनिरीक्षक एमआयडीसी पैठण) यांना राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

   दिलीप चौरे हे सध्या पैठण तालुक्यातील एमआयडीसी पैठण येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.त्यांनी पोलीस सेवेमध्ये ३४ वर्ष उल्लेखनीय कामगिरी करत आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांनी पोलीस ठाणे करमाड, चिकलठाणा ,बिडकीन, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा येथे सेवा केलेली असून त्यांना उत्कृष्ट कामाबद्दल ३५० बक्षीस, दहा प्रशस्तीपत्रके व पाच प्रशंसा पत्रके मिळालेली आहेत. गंभीर गुन्ह्याचे तपासाचे कागदपत्र तयार करून आतापर्यंत वीस गुन्ह्यात आरोपींना दहा वर्ष, पाच वर्ष व जन्मठेपेच्या शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे .तसेच विविध पोलीस ठाण्यातील खुनाचे  क्लिष्ट गुन्हे, दरोडा, जबरी चोरी व जिल्ह्यातील  मोक्का कायद्यातील गुन्ह्याचे तपासकामी मदत केलेली आहे.

————

फोटो : मुंबई :  राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक स्वीकारताना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here