उमेद अभियान बंद करण्याची क्रांतीसेनेने मागणी करताच कोंढवड येथे बँक मेळावा

0

मेळाव्यात एकच प्रकरण दाखल 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

कोंढवड येथील स्वयंसहाय्यता महिला समुहातील महिलांनी क्रांतीसेनेकडे तक्रारी केल्याने सोमवार दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना तहसील कार्यालय मार्फत क्रांतीसेनेने उमेद अभियान बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देत. उमेद अभियानाबाबत आवाज उठविल्याने उमेद आधिकाऱ्याकडुन कोंढवड येथे एचडीएफसी बँक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

          या मेळाव्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडुन बँक मेळाव्यासंदर्भात मेळाव्याच्या दिवशीच दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. ३८ मिनिटांनी उमेद समुह कोंढवड या व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज पाठवुन दु. १२ वा. ३० मिनिटांनी एचडीएफसी बँक मेळावा आहे, असा मेसेज टाकण्यात आला. परंतु तोपर्यंत बहुसंख्य महिला या कामानिमित्त घरातून बाहेर पडल्यामुळे उपस्थिती फारच नगण्य होती. ज्या  महिला उपस्थित होत्या त्यांना या मेळाव्याची पुर्व कल्पना नसल्याने कागदपत्रांची कुठलिही पुर्तता करता आली नाही. बँक मेळाव्यात फक्त एकाच गटाचे कर्ज प्रकरण दाखल करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी किमान मेळाव्याच्या आदल्या दिवशी गावातील अभियानाच्या जबाबदार व्यक्तीला फोन, मेसेज द्वारे उद्या गावात बँक मेळावा घेऊ, अशी कल्पना देणे गरजेचे होते. परंतु तसे न करता गावात आल्यानंतर व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज टाकवुन माहिती दिली. महिलांना मेळाव्याची माहिती वेळेवर न मिळाल्याने अनेक गरजवंत महिला वंचित राहून बँक मेळावा अयशस्वी झाला.

संबंधित अधिकाऱ्यांचा बँक मेळावा अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी ठराविक महिलांना बाजुला घेऊन गावातील सीआरपी बदला असा सल्ला दिला असल्याची वार्ता कानी पडल्याने दिवसभर उमेद अभियानाचे अधिकारी गावात अभियान राबविण्यासाठी आले होते का राजकारण करायला ? अशी उलटसुलट चर्चा अभियानाच्या महिला सदस्यांमध्ये रंगली होती. 

चौकट

 उमेद अभियान केवळ कागदावर 

        उमेद आभियानाचा महिला बचत गटांना स्वतःच्या पायावर उभे करुन महिलांमध्ये उमेद निर्माण करण्यासाठी अभियान उघडण्यात आले होते.परंतू या अभियानाचा महिलांना उपयोग होत नसल्याने क्रांतीसेनेने हे अभियान बंद करण्याचे आंदोलन हाती घेतल्या नंतर अधिकारीवर्ग खडबडून जागा होत.केवळ कागदावर हे अभियान चालू असून मेळावे घेतल्याचे दाखविण्याचा केविलवाणी प्रयत्न अधिकारी करीत आहेत.

चौकट

तुम्ही अभियान राबवा, राजकारण करायला क्रांतीसेना सक्षम आहे – म्हसे

      आभियानाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन महिलांना राजकारणाचे धडे देण्याऐवजी गरीब, गरजु महिलांना आभियांनाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, क्रांतीसेना राजकारण करण्यासाठी सक्षम असल्याचा इशारा क्रांतीसेनेच्या महिला अध्यक्षा भारतीताई म्हसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here