उमेद अभियान बंद करण्याची क्रांतीसेनेची मागणी

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

शासन राबवित असलेले उमेद अभियानाचा मुळ उद्देश साध्य होत नसेल तर हे अभियान राबविणे बंद करून ग्रामीण भागातील गरीब महिलांचा वेळ, खर्च व जनतेने टॅक्स स्वरूपात शासनाला दिलेल्या पैश्यांची या अभियानाद्वारे होणारी उधळपट्टी त्वरित थांबवावी, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील ७१ लक्ष गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या करीता समुदाय संघटन, विविध पथदर्शी प्रकल्प, स्वयंसेवी व शासकीय तसेच खाजगी संस्थासोबत भागीदारी अद्यावत मनुष्यबळ संसाधन विकास पद्धती, शाश्वात उपजीविकेचे स्तोत्र उभे करण्याकरिता अभियानामार्फत तसेच विविध वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून वेळेवर, किफायत व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा, कृतीसंगमांच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा गरीब कुटुंबांना लाभ मिळविण्याकरिता समुदाय स्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करणे, अशा अनेक नाविन्यपूर्ण व परिणामकारण पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. परंतु काही भागात या योजनेच्या प्रशासकीय अधिकारी व बँकांकडून महिला स्वयंसहाय्यता समुहांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. महिला समुहांकडुन कर्जपुरवठा करण्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता करुनही वेगवेगळ्या पद्धतीची उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महिलांमध्ये आभियानाच्या नावाप्रमाणे जी उमेद निर्माण झाली होती, तिचे खच्चीकरण करण्याचे काम संबंधित यंत्रणा करीत आहे.

महिलांनी अनेक हेलपाटे मारुनही त्यांची कामे व अभियानाचे उद्दिष्टे साध्य होत नसेल तर अभियान राबविणे बंद करून ग्रामीण भागातील गरीब महिलांचा वेळ, खर्च व जनतेने टॅक्स स्वरूपात शासनाला दिलेल्या पैश्यांची या अभियानाद्वारे होणारी उधळपट्टी त्वरित थांबवावी, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सुरेशराव लांबे, महिला क्रांतीसेनेच्या तालुका अध्यक्षा भारती म्हसे, राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष वैशाली म्हसे, सचिव मंगल म्हसे, कोषाध्यक्ष भारती पवार, सीआरपी राधिका म्हसे, जिजाबाई म्हसे, रोहिणी म्हसे, उमा म्हसे, स्वाती म्हसे, लता म्हसे, रोहिणी संभाजी म्हसे, मंदा पेरणे, शांताबाई म्हसे, छाया म्हसे, कमल पवार आदींसह महिला उपस्थित होत्या.

चौकट

उमेद अभियानाचे उद्दिष्टे साध्य होत नसेल तर हे अभियान बंद करण्यात यावे. या मागणीला राहुरी तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी सक्रीय पाठिंबा दिला. कोंढवड येथील महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या समस्यांचे त्वरित निराकरण न झाल्यास महिला क्रांतीसेनेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा अध्यक्षा भारतीताई म्हसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here