उरण तालुक्यात सरत्या पावसाच्या हजेरीने शेतकरी हवालदिल  

0

उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दरवर्षी नवरात्रीत अचानकपणे हजेरी लावणारा सरता पाऊस यंदा नवरात्रौत्सवात उसंती देणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून संपुर्ण उरण तालुक्यात हजेरी लावली आहे.पर्वा अर्धा तास तर काल सकाळी 11 : 30 पासून एक तास व दुपारीही 2 वाजताचे सुमारास जोरदार पाऊस कोसळला आहे.आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दिवसभर सतत पाऊस सुरु आहे.या पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्यांना  उकाडा कमी होऊन दिलासा मिळाला आहे.वातावरणात थंडावा निर्माण होत आहे.मात्र महागाईच्या जोखडात अडकलेल्या गरीब व सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे शेती आणि त्यामध्ये  लागवड करण्यात आलेल्या भातपिकांना फुलोरा येण्याच्या अवस्थेत असतांना या सरत्या पावसाचा फटका बसत असून, हातातोंडाशी आलेले शेतातील भातपिक कोसळून अतोनात नुकसान होत आहे.

या शिवाय काही उंच जमीन असलेल्या भातशेतीत चिऱ्या कोलम,हलवा व अन्य लवकर होणारी भातपिके यांचेही पिक शेतकऱ्यांच्या हातून जाऊन त्याची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील शेतकरी पिकनुकसानीच्या संकटात सापडला आहे.त्यातच हा सरता पाऊस अजून किती दिवस कोसळणार याचाही अंदाज येत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून,शेतकरी हवालदिल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here