उरण नगर परिषद वाचनालयात पुस्तकांचे पूजन करून धनत्रयोदशी साजरी.

0

उरण दि 23(विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील विमला तलाव शेजारी असलेल्या उरण नगर परिषदेच्या माॅंसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयामध्ये दिप पुजन करत असताना स्पर्धा परीक्षे करिता अत्यावश्यक असलेल्या पुस्तकांचे पुजन करण्यात आले. मानवी जीवनात, मनुष्याच्या आयुष्यात असलेले पुस्तकांचे महत्वाचे स्थान ओळखून  धनत्रयोदशी निमित्त पुस्तकांचे पुजन करुन धनत्रयोदशी साजरी करण्यात आली.यावेळी एन आय हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक  टि डब्ल्यू पाटील , प्र. ग्रंथपाल संतोष पवार, नियमित वाचक विद्यार्थी शुभम गौडदाब, महेंद्र मेश्राम व वाचक वर्ग उपस्थित होते.

  उरण नगरपरिषदेच्या लायब्ररी मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असणारी यूपीएससी, एमपीएससीची बहूतांश पुस्तके विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहेत.जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या गरुडझेप संकल्पनेची माहिती सर्व विद्यार्थ्यांना येथे दिली जाते.आणि एक विशेष म्हणजे 10 वी,  12 वी सायन्स, काॅमर्स चे बोर्ड परिक्षेला सोडविलेल्या पेपर्सचा संच देखिल येथे उपलब्ध आहे.

तरी ज्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक अभ्यास करावयाचा आहे त्यांनी  उरण नगरपरिषदेच्या माॅंसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयामध्ये नक्की अभ्यास करण्यासाठी यावे.हि आपल्या साठी मोफत सुवर्ण संधी आहे.असे मत ग्रंथपाल तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here