उरण मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन 

0

उरण दि 22(विठ्ठल ममताबादे ) : टाटा हॉस्पिटल व खारघर ब्लड बँक यांच्या सहकार्याने कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, मी उरणकर सामाजीक व सांस्कृतीक संस्था उरण, माजी विद्यार्थी संघ, उरण महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सामाजीक संस्था उरण, वूमन ऑफ विसडम शैक्षणिक व सामाजिक संस्था उरण,टायगर ग्रुप उरण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, तहसील कार्यालय समोर, उरण शहर येथे मंगळवार दि. 27/09/2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी महाविद्यालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here