उरण राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून अंगणवाडी सेविका आशा वर्कर व मदतनीस यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

0

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक 16/10/2022 रोजी दुपारी 3 वा. आनंदी हॉटेल, कोटनाका उरण येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस उरण तालुका व शहर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून समाजसेवा करून सर्वोत्तम कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.

 भावना घाणेकर( महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला राष्ट्रवादी काँग्रेस तथा निरीक्षक नवी मुंबई ), प्रशांत (भाऊ )पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक नवी मुंबई) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या सोहळ्याचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले. यावेळी मनोज  भगत (उरण तालुका अध्यक्ष), वैजनाथ  ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उरण विधानसभा अध्यक्ष ),कुंदाताई ठाकूर (महिला जिल्हा सरचिटणीस ),ॲड.भार्गव पाटील (जिल्हा उपाध्यक्ष ), जैद मुल्ला (माजी नगरसेवक )आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका , मदतनीस व आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते.

उरणमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या  प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस यांचा सत्कार, सन्मान झाल्याने उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,मदतनीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here