उरण शहरातील नागरी सुविधा बाबत नगरपालिकेला शेकाप तर्फे निवेदन.

0

शहरचिटणीस शेखर पाटील यांचा पुढाकार.

उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )उरण शहरातील नागरी सुविधा बाबत  नगरपालिकेचे  मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना शेतकरी कामगार पक्षाचे उरण शहर चिटणीस शेखर पाटील यांनी/ष्टमंडळा समवेत निवेदन सादर केले. यावेळी निवेदनात उरण शहरातील आनंद नगर,राजपाल नाका,कोटनाका, गणपती चौक, विवेकानंद चौक येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुनियोजित धोरण आखण्याची विनंती केली. तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी  अडथळे दूर करण्यासाठी भरारी पथक आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरच भरारी पथक  नेमण्यात येऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील तसेच वाहतुकीचे नियमन ट्राफिक पोलिसांतर्फे करण्यात येईल असे सांगितले. शहरातील पदपथ मोकळे करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना चालण्यासाठी मोकळे करा तसेच अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करा अशी मागणी शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी यांच्याकडे केली.शहरातील प्रभागामध्ये असलेल्या  पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे शासनाची थकीत पाणी पट्टी न भरल्यामुळे शहराला एमआयडीसी कडून पाणीपुरवठा होत नाही यासाठी थकीत पाणीपट्टी अदा करून शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा वाढवावा, शहरातील एम एम आर डी च्या  माध्यमातून रस्ते तयार करण्यात आले. मोरा भागाकडे जाताना रस्ते अर्धवट आहेत.रस्ते अर्धवट व रस्त्यावर विद्युत पोल यामुळे एसटी वाहतूक बंद आहे.यासाठी त्वरित उपायोजना करावी. यावेळी द्वारका नगरी विभागातील रस्ते गटारे बांधण्यात यावी अशी मागणी महिला आघाडीचे अध्यक्ष सीमा घरत  यांनी केली. तसेच धुळीवाडा येथील पाण्याची समस्या रस्ते स्वच्छ करणे कीटकनाशकांची फवारणी करावी अशी मागणी विभागप्रमुख दिलीप पाटील यांनी केली. शहरातील प्रवेशद्वार आनंद नगर येथे नगरपालिकेच्या जागेत सुलभ शौचालय बांधून नागरिकांची सोय करावी. त्याचबरोबर आनंद नगर मधून  परंपरागत पायवाट  सेंट मेरी शाळेकडे जाते  ती बंद केली आहे ही पायवाट सुरू करावी. जेणेकरून विद्यार्थी व नागरिकांना महिलांना जाणे येणे सुख सोयीचे होईल.आनंदनगर गेटवरील असणाऱ्या वर्दळीच्या मुळे  आनंदनगर कडे येताना जाताना रहिवाशांना यांना अवघड झालेले आहे तरी येथील पदपथ मोकळे करावेत.जेणेकरून येथे छोटे-मोठे अपघात होणार नाहीत.तसेच लाल मैदानात गांजा दारू पिऊन होणारे अनैतिक प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी रखवालदार नेमावा. अशी मागणी  करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी  राहुल इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शहरातील समस्या कडे प्राधान्याने  लक्ष देणार असल्याचे शिष्ट्य मंडळाला मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले. यावेळी शहर चिटणीस शेखर पाटील यांनी या समस्या बाबत प्रत्येक विभागाला भेट देऊन  तेथील समस्या सोडवण्यासाठी आवाहन केले. शिष्ट मंडळाच्या मागणी नुसार मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी प्रत्येक विभागाला भेट देण्याचे मान्य केले. उरण शहराच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी शेकाप कटिबद्ध आहे. विकास कार्यात शेतकरी कामगार पक्षाचे (शेकापचे) सरचिटणीस आमदार जयंत भाई पाटील,आमदार बाळाराम  पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप आपल्या सोबत  असल्याचे सांगितले.  यावेळी  तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, महिला आघाडी अध्यक्ष सीमाताई घरत,शहराध्यक्ष नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, शहर पदाधिकारी चिंतामण गायकवाड, शहर पदाधिकारी  अनंत घरत, शहर पदाधिकारी दिलीप पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष नारायण पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here