औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण शिक्षक देत असतात.

0

सातारा : गुरुविना कोण दाखविल वाट ? …या न्यायाने शिक्षकच औपाचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण देत असतात. याच सूत्रांनुसार  जीवनात महामुलकरसर व वीरसर यांनी आम्हाला घडविले. त्यामुळेच आज आम्ही खऱ्या अर्थाने उभे राहिलो आहे.असे गौरवोद्वार रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक मंगेश कारंडे यांनी काढले.

                 येथील सौभाग्य मंगल कार्यालयात जी.बी.तथा प्रभाकर महामुलकर यांच्या ६६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा अभिष्टचिंतनपर विद्यार्थी-शिक्षक  असलेले  मंगेश कारंडे यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी साहित्यिक सुरेश शिंगटे होते. मंगेश कारंडे म्हणाले, “शिस्त व बचतीचे धडेही गुरूंकडून मिळाले असल्याने आम्ही कौटुंबिक व सामाजिक जीवन सर्वार्थाने जगत आहे.” प्रमोद दगडू मोरे म्हणाले, “शिरवली परिसरात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढील प्रवास सुखकर झालेला आहे. शिक्षकांनी बलिदान दिल्याचेच द्योतक म्हणून मी विद्यार्थी व शिक्षक म्हणून साक्षीदार आहे. खरोखरच,शिक्षकांनी आपले जीवन खाईतच टाकले होते. शिक्षकांनी पुस्तकाशिवाय जीवन जगण्याचेही धडे दिलेले आहेत.” किशोर सुतार म्हणाले, “शिरवली हायस्कुलमुळेच व्यवसायात यश मिळवता आले.”

    बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले, “अकेला चना कोई फोड नही सकता ?… या न्यायाने आम्ही सर्व गुजनांनी कोणाचाही विचार न करता फक्त आणि फक्त अध्ययनार्थीसाठी कोणताही मोबदला न घेता टीम वर्क म्हणून रात्रंदिन काम केले होते. विशेषतः सकाळ-रात्र अभ्यासिका,मोठ्या सुट्टीत जादा तास आदी विविध उपक्रम घेऊन सातत्याने १०० टक्के यश मिळविण्यात यशस्वी ठरलो होतो.”

   ग्रामीण कथाकार सुरेश शिंगटे म्हणाले, “१९७४ साली महामुलकरसर यांच्यासह आम्ही एसएससी केली.तद्नंतर अनेक प्रकारची कामे करून शेवटी शिक्षक झालो.महाबळेश्वर तालुका फिरण्यासाठी काही दिवस ठीक आहे.मात्र,तेथील प्रतिकूल परिस्थितीत राहून निवृत्तीपर्यंत ज्ञानदानाचे काम करणारी शिक्षकवृंद यांना सलाम केला पाहिजे.” सत्कारास उत्तर देताना प्रभाकर महामुलकर म्हणाले,”नोकरीच्या अगोदर समाजकारणासह राजकारण करीत होतो.मात्र,नोकरी करीत असल्यापासून ते आजतागायत कोणत्याही प्रकारचे राजकारण केले नाही.आता तर राजकारणावर न बोलणेच बरे. अभ्यासात चुकले तरी चालेल. मात्र,जीवनात यशवी व्हायचे असेल तर शिस्त व वेळ महत्वाची आहे.”

           यावेळी दुर्गाशेठ साळेकर, उमाकांत जाधव आदींनी अभिष्टचिंतनपर कौतुकाचा वर्षाव आपापल्या मनोगतातून केला.

        सौ.स्नेहा रोहित महामुलकर व रोहित प्रभाकर महामुलकर  यांनी स्वागत केले.गणपत महामुलकर यांनी सूत्रसंचालन केले.संदेश महामुलकर यांनी आभारप्रदर्शन केले.

            सदरच्या कार्यक्रमास डॉ. कटारिया परिवारातील स्वाभिमान व स्वामींनी मालिका फेम सौ. कटारिया,विलास महामुलकर, अहिरेकरसर,डी.एन.गोळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, सौ.मंगेश कारंडे संपूर्ण परिवार, रायगाव सोसायटीचे माजी चेअरमन शरद निकम व उमाकांत जाधव, बाबासाहेब महामुलकर, यशवंत महामुलकर, अंकुश गायकवाड याचा मुलगा व सून,तुषार व अक्षय दीपक चव्हाण,सौ.चव्हाण, नाना महामुलकर,अमोल काकडे, धैर्यशील निकम परिवार,संपूर्ण नवले परिवार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी, नागरिक – ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो : अभिष्टचिंतनपर प्रभाकर महामुलकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here