देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
मोटरसायकलवरून जात असताना कट मारल्याचा जाब विचारला म्हणून दोघां जणांवर धारदार विळ्याने प्राण घातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिनांक २३ ऑक्टोबर रोजी राहुरी तालूक्यातील गुहा परिसरात घडली.
या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झालेत. रात्री आठ वाजे दरम्यान विकास धोंडीराम सौदागर व त्याचा चूलत भाऊ रमेश अशोक सौदागर हे दोघेजण त्यांच्या मोटरसायकलवरून किरणा सामान आणण्यासाठी गुहा येथील बसस्थानक पासून जात होते. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे त्याच्या मोटरसायकलवर जोरात आला. आणि त्याने विकास सौदागर यांच्या मोटरसायकल ला कट मारला. त्यावेळी विकास सौदागर हा त्यास म्हणाला कि, तू आम्हाला कट का मारला असे विचारल्याचा राग आल्याने त्याने विकास सौदागर याला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. रमेश सौदागर हा भांडण सोडवीण्यासाठी आल असता आरोपी म्हणाला कि, तूम्ही माझ्य नादी लागतो काय? गावात कोणीच माझ्या नादी लागत नाही.
आज तूम्हाला कायमचा संपवून टाकतो.
असे म्हणून त्याने धारदार दातऱ्या असलेल्या विळ्याने रमेश सौदागर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला.हाता पायावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याच बरोबर विकास सौदागर याच्यावर देखील वार करून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर सौदागर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली विकास धोंडीराम सौदागर, वय २४ वर्षे, राहणार, गुहा, ता. राहुरी याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी अक्षय विजय शिंदे, राहणार गुहा, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं.१०१७/२०२२ भादंवि कलम ३०७, ३२४,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण, धमकी व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलायया घटनेत विकास धोंडीराम सौदागर व रमेश अशोक सौदागर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथील रूग्णालयात उपचार सुरू
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक महादेव शिंदे हे करीत आहेत.