करुणा मुंडे यांनी केला भारत भोसलेवर बदनामीचा गुन्हा दाखल

0

संगमनेर : राज्याचे माजी मंत्री तथा बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी शुक्रवारी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठत तालुक्यातील कोंची येथील भारत संभाजी भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भोसले यांनी सोशल मीडिया द्वारे आपली बदनामी केली असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी शहर पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये भारत भोसले यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           करुणा मुंडे-शर्मा यांनी भारत संभाजी भोसले रा. कोंची तालुका संगमनेर याने आपली सोशल मीडियाद्वारे बदनामी केली असल्याचे सांगत या प्रकरणाची शहर पोलिसांनी चौकशी करावी अशी  मागणी केली आहे. दीड दोन महिन्यापूर्वी करुणा मुंडे यांनी भारत भोसले यांनी आपली आर्थिक फसवणूक केली असल्याबाबतचा भारत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भारत भोसले हे वारंवार सोशल मीडियावर आपल्या चारित्र्याविषयी वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची तक्रार मुंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे. दरम्यान करुणा मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्यासाठी आपल्याकडून पैसे घेतले होते असा आरोप यापूर्वी भारत भोसले यांनी केला होता. त्यावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की जे माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करतात त्यांना घरात खायला नाही. त्यांच्याकडून मी कशाला पैसे घेईल. त्यांनी माझ्यावर जो पैसे घेतल्याचा आरोप केला आहे तो पूर्णतः खोटा असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे परस्पर फिर्यादी दाखल असताना हे  प्रकरण नक्की काय आहे हे आता पोलीस तपासातच निष्पन्न होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here