पैठण दि .९: स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा पैठण औरंगाबाद रस्त्यावरील संत एकनाथ कारखाना परिसर येथे रविवार रोजी संपन्न झाला . या सोहळ्यानिमित्त पेंन्टागॉनसुपर स्पेशलिटी हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या हस्ते संपन्न झाले . या शिबिरामध्ये जवळजवळ दोनहजार भाविक भक्तांनीशिबिरात तपासणी करून घेतल्याचे शिबिराचे आयोजक कर्करोग तज्ञ डॉक्टर अशोक गलांडे यांनी दिली .
संत एकनाथ साखर कारखाना परिसर येथे आज पेंटागॉन हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले . या शिबिराचे उद्घाटन सपोनि भागवत नागरगोजे, माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब सोलाट , तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव [आण्णा ] पाटील थोटे, ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ गलांडे , बिलाल भाई शेख,अरुण पाटील काळे,विलास पाटील दहीहंडे ,उपसरपंच रहीम्मोदीन पठाण ,सरपंच काका बर्वे , छावावा तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते, ग्रापंस लाला कुरेशी, भरत मुकुटमल ,संतोष घुले,सुशील बोडखे, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा, कृष्णा उगले सह आदींच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिरामध्ये विविधतपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिरामध्ये ककर्करोग तज्ञ डॉ अशोक गलांडे, डॉ . सारंग देशमुख, स्त्री रोगतज्ञ डॉ .अश्विनी गलांडे, डॉ . अजिंक्य देशमुख, डॉ . प्रफुल पांडे, डॉ . मिलिंद कुलकर्णी यांनी या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांची मोफत तपासणी केली या शिबिरामध्ये जवळजवळ दोन हजाराच्या च्या पुढे भक्तांच्या मोफत रुग्ण तपासणी केल्याची माहिती या शिबिराचे आयोजक अशोक गलांडे यांनी दिली . शिबीर यशस्वी करण्यासाठी कैलास काळे ,नितीन गावंडे, प्रवीण खरात,पप्पू गलांडे, रविंद्र तारळकर सह आदींनी परिश्रम घेतले .
—————
फोटो : पैठण : मोफत आरोग्य तपासणी करताना डॉ अशोक गलांडे.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)