कलागुणांनी बहरलेले शहर असल्याने राजधानीचा लौकिक उत्तरोत्तर चढत्या क्रमाचा आलेख आढळुन येईल.

0

सातारा : मुंबई-पुणे पाठोपाठ सातारा शहराची नोंद कालागुणांची जोपासना करणारी आहे.अशी ही ओळख निर्माण झाल्याने उत्तरोत्तर चढत्या क्रमाचा आलेख आढळुन येईल. असे प्रतिपादन पांडे यांनी केले.

             येथील दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला, “दीपावली संध्या” या कार्यक्रमात हिंदी व मराठीत गाजलेल्या गीतांची मैफिल दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली. तेव्हा संलल्पना- दिग्दर्शक  मुकुंद पांडे मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र पाटील, अनिल वीर,सागर,सतीश नेवसे व विनायक भोसले होते.

       मुकुंद पांडे म्हणाले,”दिवाळी पहाट – संध्या ही संकल्पना मुंबई-पुणे येथे रुजली असली तरी सातारा मागे नाही.१९६७च्या काळातील गाणी अजूनही जगायला शिकवते.संगीतामध्ये ताकद आहे.”  नरेंद्र पाटील म्हणाले,”तानसेन यांनीही ७२ व्या वर्षी गाण्यातील लय विकसित करायची आहे.असे म्हटले होते. अर्थात,मानवाचे जीवनच गाणे झालेले आहे. कल्पनेला मुहूर्त स्वरूप देण्याचे काम शिरीष चिटणीस करीत असतात. त्यामुळेच लोकांपर्यंत पोहचत असते.हौशी कलाकारांना दालन उपलब्ध होत आहे.एकटा गातो तो रियाज असतो.तेव्हा समूहाने गायिलेले कार्यक्रम सक्षम असे होतात.”

    अनिल वीर म्हणाले,”जीवन हे सुद्धा गाणे आहे.त्यामुळे तर जीवन सुखकर होत असते. चिटणीस साहेब यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे.ते विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.अष्टपैलू असे व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी घेतलेले कार्यक्रम यशस्वी होतात. खरोखरच,सातारा नगरीला त्यांचा अभिमान आहे.”

           शिरीष चिटणीस म्हणाले, “आवाजाची/कोणत्याही कलेची देणगी असते.ती विकसित करणे गरजेचे आहे.संगीत मानवास एकत्रीत आणण्याचे काम करते. निरपेक्षपणे काम वीरसर यांच्यासारखे अनेकजण करीत असतात.निरपेक्षभावना ही गण्यासारखीच आहे.”असे स्पष्ट करीत चिटणीस यांनी जुन्या गाण्यांचा संदर्भ देत इतिहासच कथन केला. प्रा.श्रीधर साळुंखे म्हणाले, “संगीताची ताकद फार मोठी आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने जीवन आनंदी होत असते.” 

     “नवी स्वप्ने नवी क्षितिजे,घेऊन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नाना, दिव्ययशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,ही दिवाळी …” या पद्धतीने संकल्पना-दिग्दर्शक मुकुंद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण कुलकर्णी, सौ.विजया चव्हाण, सौ.ज्योत्स्ना खुटाळे, ऍड. लक्ष्मीकांत अघोर,सौ.प्रिया अघोर, ऍड.आशुतोष वाळिंबे व सौ.रेश्मा वाळिंबे,तसेच दिपलक्ष्मीचे कोडोली शाखाधिकारी अग्नेश शिंदे आदींनी उत्स्फूर्त अशी गीते गाऊन रात्रौ उशिरापर्यंत श्रोतावर्गाना खिळवून ठेवले होते. सुभाष कुंभार यांची ध्वनी व्यवस्था होती. याकामी, पतसंस्थेचे संस्थापक – चेअरमन शिरीष चिटणीस, संचालक अनिल चिटणीस, जगदीश खंडागळे,मुख्य शाखेचे अधिकारी  लक्ष्मण कदम, व्यवस्थापक विनायक भोसले, व्हाईस चेअरमन सौ.सुरेखा रानडे,शुभम बल्लाळ,सचिन शिंदे व कर्मचारीवृंद यांनी अथक असे परिश्रम घेतले.

फोटो : कलाकारांसमवेत शिरीष चिटणीस,अनिल वीर व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here