कानवडे औषधी वनस्पती शेतीला कृषी उपसंचालकांची भेट

0

संगमनेर : तालुक्यातील सावरचोळ येथील उपक्रमशील शेतकरी तथा भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीशराव कानवडे यांनी निर्माण केलेल्या कानवडे औषधी वनस्पती शेतीला कृषी उपसंचालकांनी भेट देत पाहणी करत समाधान व्यक्त केले.

           सावरचोळ येथील सतीशराव पुंजाजी कानवडे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपूर्वी औषधासाठी उपयुक्त असणारी औषधी वनस्पतींची सुमारे ६०० प्रकारची सहा हजार झाडांचे रोपण केले आहे. त्याचबरोबर ३०० प्रकारच्या देशी बियाणांची बीज बँक सुद्धा त्यांच्याकडे आहे. या औषधी झाडांपासून सतीशराव कानवडे यांनी आयुर्वेदिक औषधे तयार करून मार्केटमध्ये आणली आहेत. या आयुर्वेदिक औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेतात दोन हजार झाडे चंदनाची असून मो हगणी बांबूची एक हजार झाडे, जांभूळ ३०० झाडे लावून सर्व नैसर्गिक पद्धतीने पिकवली आहेत. अनेकदा त्यांच्या या आयुर्वेदिक शेतीला पाहण्यासाठी राज्य आणि देशातून कृषीतज्ञ तसेच शेती अभ्यासक त्यांच्या या उपक्रमशील शेतीला भेट देण्यासाठी येत असतात. नुकतेच कृषी उपसंचालक रवींद्र माने, तंत्र अधिकारी किरण मोरे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, पंकज कराड यांनी कानवडे औषधी शेतीला भेट देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले. यावेळी सतीशराव कानवडे यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत करून माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here