देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
आधीच अतिवृष्टीने हातात आलेली पिके गेली चिखलात गोळा केलेला कापुस सुकण्यासाठी ठेवला. परंतू दिवाळीच्या फटाक्याने शेतकऱ्यांच्या त्या कापसावर जळता फटाका पडल्याने सुमारे आठ क्विंटल कापुस जळून खाक झाला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे घडली.
राहुरी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामध्येच आरडगाव येथील संतोष त्रिंबक साळुंके या शेतकऱ्यांचा सुमारे पाच एकर कपाशीचे पावसाने मोठे नुकसान झाले.
पावसाने भिजलेला कापूस वेचणी करुन घरासमोर वाळविण्यासाठी घातला असता या कापसाला ऐन दिवाळीच्या दिवशी मुले दिवाळी सणाचा आनंद घेत असताना फटाक्यांची माळ पेटवीली आणि जवळच वाळत असलेल्या आठ क्विंटल कापसाच्या ढिगाऱ्याला आग लागली.
या आगीत कापूस जळून भस्म झाला. त्यांनी आरडाओरडा सुरू केला परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला