काऱ्हाटी ता. बारामती येथे कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी गेली वाहून. 

0

बारामती: काऱ्हाटी ता. बारामती नदी पार करत असताना पुलावरुन वाहणाऱ्या  पाण्याचा अंदाज न आल्याने ही गाडी वाहून गेली. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. लोणी भापकर येथील डॉ. बारवकर हे  काऱ्हाटी  येथील आपला दवाखाना बंद करून घरी जात होते. मागील दोन दिवसात तालुक्यातील मोरगाव, तरडोली, आंबी,  माळवाडी, बाबुर्डी आदी भागात सर्वदुर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे . बारवकर हे नदी पात्रावरील पूर पार करत  असताना नदीपात्राच्या मध्यभागी आले असता आणि पाण्याचा ओघाने व पाण्याच्या वेगाने अंदाज न आल्याने पुलावरून गाडी वाहून लागली. यादरम्यान त्यांनी  गाडीतून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले.  यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.  नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही नदीपत्रात न जाण्याचे आव्हान महसूल खात्याच्या वतीने गावकामगार तलाठी श्याम झोडगे यांनी  केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here