किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल        

0

संगमनेर : औषधाच्या दुकानांमध्ये  चिटकून उभे राहू नका असे सांगितल्याचा राग आल्याने एका जणाला बेदम मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील नवीन नगर रोड परिसरात घडली याबाबत पोलिसांनी तीन जणांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.                              

        याबाबत समजलेली माहिती अशी की, कृष्णा  संजय ओझा राहणार अभिनव नगर  हे  शुक्रवारी मध्य रात्री शहरातील नवीन नगर रोड परिसरातील  मेडिकल स्टोअर मध्ये औषध घेण्यासाठी गेले होते. यावेळी अक्षय खर्डे हा ओझा यांना चिटकुन उभा राहीला. ओझा यांनी त्यास बाजुला उभे रहा असे सांगितले असता या ठिकाणी उभे असलेल्या अक्षय खर्डे व त्याचा साथीदार लांडगे यांनी ओझा यांना  शिवीगाळ करुन  मारहाण केली. यावेळी आकाश खर्डे याने ओझा यांना मारुनच टाका अशी धमकी दिली.अक्षय खर्डे ,आकाश खर्डे  यांनी त्यांच्या हातातील जाड कड्याने ओझा यांच्या डोक्यात कपाळावर मारुन गंभीर जखमी केले. आकाश खर्डे याने   ओझा यांच्या गळ्यातील सोन्याची 9 ग्रॅमची चैन ओढुन नेली.  घटनेनंतर तिघेजण पळून गेले.               याबाबत कृष्णा  ओझा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी  अक्षय खर्डे, आकाश खर्डे, मयूर लांडगे सर्व राहणार संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा र.नं. ९१२/२०२२  भा.द.वि कलम ३२६,३२७,३२३,५०४,५०६ प्रमाणे  गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार शेख करीत आहेत.या घटनेमध्ये  ओझा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here