पैठण,दिं.२०: पैठण तालुक्यातील साखर कारखाना परीसरात एका हाॅटेल मध्ये दोघात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पाठीमागे चाकुने वार करीत खुन केल्याची घटना घडली यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत एम आय डी सी पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार(दिं.१८) रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास आरोपी रामेर उर्फ गजेसिंग बोत(वय ३८ वर्ष) व मयत अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख(वय ३५ वर्ष) हे पैठण -औंरगाबाद महामार्गावरील साखर कारखाना परिसरातील एका हॉटेल मध्ये एकत्र भजे खात असतांना या दोघांचे शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली आणि त्यानंतर झटापट सुरू झाली त्याच वेळी रामेर उर्फ राम याने तिथेच बाजूला असलेल्या अंडा आम्लेट दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकुने सांडू याच्या पाठी मध्ये दोन वार केले यामध्ये सांडू हा गंभीर जखमी झाला. त्याला प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता रात्री १० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खुन केल्यानंतर आरोपी राम हा ईसारवाडी शिवारातील एका उसाच्या शेतात लपून बसला होता. एमआयडीसी पैठण पोलिसांना त्याची खबर मिळताच सपोनि भागवत नागरगोजे व पोलीस कर्मचारी यांनी त्यास अटक केली. घटनास्थळी पैठण उपविभागागीय अधिकारी डॉ विशाल नेहूल,सपोनी भागवत नागरगोजे यांनी भेट देऊन पाहणी केली. मयतावर औंरगाबाद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन व पंचनामा फौजदार अशोक चौरे यांनी केले.या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ शफिक शेख रा.पिंपळवाडी यांच्या फिर्यादी वरून कलम ३०२ प्रमाणे आरोपी रामेर उर्फ राम गजेसिंग बोत रा.साखर कारखाना कॉलनी याच्याविरूद्ध कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, फौजदार दिलीप चौरे,बीट जमादार राहूल महोतमल, दिनेश दाभाडे, गणेश शर्मा, मिलींद घाटेश्वर,ओम डहाळे, कृष्णा उगले, राजेश सोनवणे करीत आहे.
——–
प्रतिक्रिया
अशोक नागरगोजे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) : सदरचा आरोपी हा मुळचा हरियाणातला असयाने तो बाहेर राज्या मध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता मी व पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच त्याच्या एम आय डी सी भागातील एका ऊसाच्या शेतात मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या अवघ्या एका तासात आरोपीस जेरबंद केले.
———-