फलटण प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासह विदर्भच्या मुलांनी आणि कोल्हापूरच्या मुले व मुलींच्या संघानी किशोर-किशोरी गटाच्या ३२वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली.
येथील घडसोली मैदानावरील शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडचा २०-१ असा एक डाव राखून धुव्वा उडविला.दुसऱ्या सामन्यात राजू पाटीलच्या अष्टपैलू खेळीमुळे कोल्हापूरच्या मुलांनी केरळवर १७-११ अशी मात केली. कोल्हापूरच्या मुलींच्या संघाने उत्तरप्रदेशवर १३-६ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. अन्य एका सामन्यात विदर्भाच्या मुलांनी हिमाचल प्रदेशचा १३-७ असा एक डावाने पराभव केला.
अन्य निकाल : मुले : उत्तर प्रदेश विजयी वि. दिल्ली २२-११ डावाने, हरियाणा विजयी वि. तामिळनाडू १३-११ दोन मिनिटे १० सेकंद राखून, पश्चिम बंगाल वि.वि. गुजरात १९-१३ एक डावाने.
मुली : हरियाणा वि.वि. मध्य भारत १८-३ डावाने, गुजरात वि.वि. बिहार २४-० डावाने, दिल्ली वि.वि. हिमाचल प्रदेश १५-६ डावाने.