कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या की घातपात ;मृतदेहावर मारहाणीच्या खुना ,राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील राहुरी कृषी विद्यापीठ येथे आज 2 वाजेच्या  दरम्यान विद्यापीठ परिसर ते गावडे वस्ती नारळाची बाग जुना धबधब्यात डिग्रस गावातील सचिन इंद्रभान गावडे (वय २३) या तरुणाचा मृतदेह आढळला असून या तरुणाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे.

             सचिन गावडे हा युवक महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. रात्री चार बारा ची ड्युटी संपवून घरी परतत असताना सदरचा युवक बेपत्ता झालेला होता.

         दरम्यान बेपत्ता तरुणाच्या शोध मोहिमेदरम्यान या तरुणाची मोटरसायकल मोबाईल व पाण्याच्या कडेला एक बूट आढळून आला त्यानुसार या तरुणाचा पाण्याच्या डोहामध्ये शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

            मृतदेह सापडला त्यावेळी मृतदेहाचे   हाताची घडी घातलेल्या अवस्थेत होते व त्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या यावरून नक्कीच घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.त्याच्या वडिलांनीही  घातपाताचा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

      जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही. तोपर्यंत अंत्यविधी होऊ देणार नाही असे मृत तरुणाचे वडील इंद्रभान गावडे यांनी सांगितले आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे पाठवण्यात आलेला आहे.

         पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here