कोपरगाव नगर परिषदेच्या वाढीव घरपट्टीला अखेर स्थगिती ! भाजप, शिवसेना व रिपाइंचे साखळी उपोषण मागे ; स्नेहलताताई कोल्हे यांच्या शिष्टाईला यश

0

कोपरगाव : दि. ३० सप्टेंबर :

        कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने गेल्या चार दिवसांपासून म्हणजे २७ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून, वाढीव घरपट्टीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आज या उपोषणात स्वत: सहभागी होऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी चर्चा करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली. तशी घोषणा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.  

कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत शहरातील मालमत्ताधारकांचा सर्व्हे करून घेतला; परंतु आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणावरून सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मालमत्ताधारकांवर लादलेली अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २७ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला जनतेचा पाठिंबा वाढत गेला. शहरातील विविध संस्था, संघटना, मंडळे व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत गेल्याने नगर परिषद मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नगर परिषदेच्या करवसुली विभागातील पाच निष्पाप कर्मचाऱ्यांना निलंबित केले. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी या पाच निरपराध कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविल्याबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  

आज चौथ्या दिवशी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तेथेच ठाण मांडले. त्यानंतर प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे आणि पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हेही उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणे घरपट्टी आकारणीचा निर्णय आणि इतर मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण स्थळापासून हलणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. 

यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि नगर परिषद मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणावरून नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीसह मालमत्ता करामध्ये भरमसाठ वाढ केली. नगर परिषद मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या चुकीच्या अहवालावरून ही करवाढ लादली. करवाढीबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असताना तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी ही करवाढ कमी करण्याऐवजी ४० टक्क्यांपर्यंत घरपट्टीवाढीला मान्यता दिली. त्यामुळे शहरातील मालमत्ताधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नगर परिषद प्रशासन गोरगरीब नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी आमदार करवाढीच्या निर्णयाला साथ देतात हे चुकीचे आहे. चुकीचे काम करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना साथ देणाऱ्या आमदारांना कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांशी काहीच देणे-घेणे नाही असे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येते, अशी टीका कोल्हे यांनी केली. नगरपालिका मुख्याधिकारी गोसावी यांनी निलंबित केलेल्या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना परत कामावर रुजू करून घ्यावे, अशी आग्रही भूमिका स्नेहलताताई कोल्हे व उपोषणकर्त्यांनी घेतली. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी त्या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात १५ दिवसांच्या आत नगरपालिका मुख्याधिकारी फेरचौकशी करून योग्य तो निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. 

प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या मालमत्ता करवाढीला स्थगिती दिल्याचे जाहीर करताच भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष सुनील कंगले, गुजराती समाजाचे ज्येष्ठ नेते राजाभाई पटेल, कापड व्यापारी असोसिएशनचे विनोद ठकराल, नारायणशेठ अग्रवाल, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्स्पोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, स. शं. कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजप माजी गटनेते रवींद्र पाठक, रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष देवराम पगारे, माजी उपनगराध्यक्ष अनिल जाधव, विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रभारी विनोद राक्षे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा, माजी अध्यक्ष अतुल काले, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, भाजपचे माजी अध्यक्ष कैलास खैरे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, भाजप युवा मोर्चाचे सुशांत खैरे, माजी नगरसेवक नयनकुमार (बबलू) वाणी, संदीप देवकर, अशोक लकारे, प्रशांत कडू, बापू पवार, संजय जगदाळे, जनार्दन कदम, अल्ताफ कुरेशी, विवेक सोनवणे, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, शिवाजी खांडेकर, सोमनाथ मस्के, नासिरभाई सय्यद, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, विद्याताई सोनवणे, दीपाताई गिरमे, मंगलताई आढाव, शिल्पाताई रोहमारे, सुवर्णाताई सोनवणे, हर्षदा कांबळे, ताराबाई जपे, वैभव आढाव, प्रसाद आढाव, फिरोज पठाण, सतीश रानोडे, रवींद्र रोहमारे, दिनेश कांबळे, विनोद चोपडा, बाळासाहेब राऊत, राहुल सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, संतोष नेरे, राजेंद्र सातपुते, सोमनाथ अहिरे, आशिष निकुंभ, चंद्रकांत वाघमारे, मयूर लचुरे, दीपक जपे, निखील जोशी, अंकुश जोशी, खालिक कुरेशी, फकीर मोहम्मद पहिलवान, किरण सुपेकर, विजय चव्हाणके, जगदीश मोरे, सचिन सावंत, गोपी गायकवाड, बंटी पांडे, दादासाहेब नाईकवाडे, विक्रमादित्य सातभाई, सागर जाधव, सिद्धार्थ साठे, राजेंद्र बागुल, रोहित कनगरे, रोहन दरपेल, वासुदेव शिंदे, रवींद्र लचुरे, सोमनाथ ताकवले, शंकर बिऱ्हाडे, अकबर लाला शेख, गोपीनाथ सोनवणे, अन्सार मन्सूर शेख, निसार मन्सूर शेख, लतिफभाई शेख आदींसह भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट….. 

शहरातील असंख्य नागरिकांनी, महिलांनी आणि सुमारे २५० संस्था आणि संघटनांनी या साखळी उपोषणाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. तसेच सर्व पत्रकारांनी या आंदोलनासंदर्भातील बातम्यांना प्रसिद्धी देऊन जनतेत जागृती निर्माण केली याबद्दल पराग संधान यांनी या सर्वांचे जाहीर आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here