देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
नगर मनमाड महामार्गावरील कृषी विद्यापिठाच्या हद्दीतील मुळा कँनाल जवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने राहुरी पोलिस ठाण्याच्या सरकारी वाहनाचे टायर फुटले तर इतर वाहने याच खड्ड्यात आदळत असल्याने राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी झाडाच्या फांद्या या खड्ड्यात उभ्या केल्याने वाहन चालकांना सुचना मिळाल्याने अनेक वाहने नुकसानी पासुन वाचले आहेत.
याबाबत माहिती अशी की, नगर मनमाड महामार्गावरील मुळा कँनाल जवळ महामार्गावर मधोमध मोठा खड्डा निर्माण झाल्याने व वाहन चालकांच्या तो खड्डा लक्षात येत नसल्यामुळे खड्ड्यात आदळून वाहनाचे नुकसान होत होते.शुक्रवारी राञी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सरकारी वाहनातून गस्त घालत असताना सरकारी वाहन याच खड्ड्यात आदळले त्यामुळे या वाहनाचा एक टायर फुटला आता पर्यंत अनेक वाहनांचे टायर या खड्ड्यात फुटले गेले आहे.वाहन चालकांच्या द्रुष्ट्रीने हा खड्डा धोक्याचा बनला आहे.
शुक्रवारी राञी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व त्यांचे सहकारी यांनी या खड्ड्यात झाडांच्या लहान फांद्या उभ्या करुन ठेवल्यामुळे इतर वाहन चालकांना येथे खड्डा असल्याच्या सुचना मिळत असल्यामुळे अनेक वाहन धारकांना खड्ड्यात आदळण्या पासुन सुटका मिळाली. वाहनांचे होणारे नुकसान टळले आहे. याच खड्ड्यात अनेक मोटारसायकलस्वार पडून जखमी झाले आहेत.