कोपरगाव भाजपातर्फे मोहम्मद पैगंबर जयंती साजरी.

0

कोपरगाव (वार्ताहर) दि. ९ ऑक्टोंबर २०२२

              कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाचेवतीने मोहम्मद पैगंबर यांची जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सार्वजनिकरित्या भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

             सर्व जाती धर्मातील लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी धर्माची जपणूक व्हावी अल्लाह परमेश्वर ईश्वर हे सगळे एकच आहेत आपण त्याची लेकरे आहोत अशी शिकवण  मोहम्मद पैगंबर यांच्यासह संत महतांनी  दिलेली आहे.

            याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, अल्ताफ भाई कुरेशी, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष खालीलभाई कुरेशी, फकिर मंहमद पहिलवान, दिव्यांग सेलचे मुख्तार भाई पठाण, बर भाई शेख नसीर भाई शेख लेखक भाई शेख रहीम भाई शेखपटाणे नामावसाई शेख, नसीर भाई सय्यद, हाजी सद्दामभाई सय्यद, सय्यद हिम भाई शेख, लियाकत सय्यद, इलियास खाटीक फिरोज पठाण एस.पी. पठाण, अहमदभाई  बेकरीवाले, आलिफ शेख, मन्सुरभाई शेख, सलीम भाई इंदौरी, सय्यद वायरमन, वसिमभाई शेख, हाशमभाई शेख, अकिल भाई महेंदी, परवेज शेख इरफान सय्यद, लौसिक मनियार, खिजर मनियार, तौफिक बागवान,  मुस्तदिगीन कुरेशी, सलमान पठाण, रविंद्र रोहमारे, सत्येन मुंदडा, सोमनाथ म्हस्के, अर्जुन मरसलेद मधुकर रिळ, वैभव गिरमे, संदिप देवकर, विनोद राक्षे, बबलु वाणी, प्रसाद आढाव, अशोक लकारे, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाजप कार्यकर्ते मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here