कोपरगाव शहरातील सर्व मालमत्तांचे वाढीव कर कमी होतील

0

आ.आशुतोष काळेंच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवास्तव करवाढी संदर्भात बहुसंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत नगरपरिषदेने योग्य ती कार्यवाही करून हरकती असलेल्या नागरिकांचे मालमत्ता कर कमी करावेत अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला दिल्या होत्या. त्याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सर्व मालमत्तांचे वाढीव कर कमी होतील अशी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

   मागील आठवड्यात आ. आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेने अवास्तव करवाढ केल्यामुळे या कर वाढीबाबत हरकती असलेल्या नागरिकांशी चर्चा करून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या समवेत बैठक घेतली होती. जीवघेण्या कोरोना महामारी नंतर नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेने केलेली करवाढ चुकीची व अन्यायकारक असल्यामुळे  नागरिकांच्या असंख्य तक्रारी येत आहे. त्यामुळे खाजगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेच्या आधारे नगरपरिषदेने केलेली करवाढ चुकीची असल्याचे दिसून येत असून चुकीचे सर्व्हे झालेल्या मालमत्तांचे फेर सर्वेक्षण देखील करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या होत्या. त्याबाबत नगरपरिषदेने आठ दिवसात काय कार्यवाही केली याची माहिती शुक्रवार (दि.२३) रोजी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडून साईबाबा तपोभूमी या ठिकाणी झालेल्या बैठकीत जाणून घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी महत्वाचा खुलासा करतांना सांगितले की, आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार वाढीव कर वाढीबाबत ज्या नागरिकांच्या हरकती आल्या त्या नागरिकांच्या मालमत्तेचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने तयारी केली आहे. परंतु कोपरगाव नगरपरिषदेने २०१६ साली निर्णय घेवून आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्या कंपनीकडून चुकीचा सर्व्हे करण्यात आला असून ज्या नागरिकांच्या मालमत्ता करात अवास्तव वाढ झाली आहे त्यांचा सर्व्हे झालेला अहवाल तपासला असता या सर्व्हेत चूका झाल्या असल्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घेतलेल्या हरकती योग्य आहे.त्यामुळे झालेल्या चुका दुरुस्त करून या नागरिकांची वाढीव करवाढ नक्कीच कमी होईल असा दिलासा देतांना सर्वच मालमत्तांचे वाढीव कर कमी होणार असल्याचा मोठा खुलासा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केला आहे. झालेली करवाढ कमी करण्याबाबतचे प्रस्ताव सबंधित कमिटीकडे पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आ. आशुतोष काळे यांनी अवास्तव करवाढी बाबत घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे कोपरगाव नगरपरिषदेला खाजगी कंपनीने केलेल्या सर्व्हेच्या आधारे आकारण्यात आलेली करवाढ चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चुकीची करवाढ झालेल्या सर्व नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. यावेळी बैठकीसाठी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीरमहंमद कुरेशी, दिनकर खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, एकनाथ गंगूले, किशोर डोखे, शैलेश साबळे, किरण बागुल, अनिरुद्ध काळे, दादा पोटे, अमोल गिरमे, मनोज नरोडे, सुनील बोरा, बाळासाहेब सोनटक्के, गणेश बोरुडे, विलास आव्हाड, कैलास मंजुळ, मनीष फुलफगर, निलेश पाखरे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – अवास्तव करवाढ कमी करणे संदर्भात कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या पाठ पुराव्याची माहिती जाणून घेतांना  आ. आशुतोष काळे समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here