जामखेड तालुका प्रतिनिधी – आगामी सण उत्सव अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनकडुन तयारी म्हणुन दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम व रूट मार्च काढण्यात आला.
जामखेड पोलीस स्टेशन मध्ये फोन आला की ,खर्डा चौक, जामखेड येथे काही टार्गेट मुलांचा जमाव जमलेला असुन त्यांच्यात वाद सुरू आहे.दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पाठवा असा फोन आल्याने ठाणे अंमलदार यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळवली असता त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमधील उपलब्ध असलेला पोलीस स्टाफ घेवुन खर्डा चौक,जामखेड येथे पोहोचले त्यावेळी तेथे जमलेल्या किंवा आजुबाजुला जमलेल्या लोकांना पोलीस इतक्या फास्टमध्ये कोठे चालले आहेत याची चाहुल लागली त्यावेळी खर्डा चौक जामखेड येथे पोहोचल्यावर कळाले की कोठेही काही झाले नाही येथे आगामी होणा-या गणेश उत्सव निमीत्त् जामखेड पोलीस स्टेशनची दंगा काबू योजना व मॉब ड्रिलची रंगीत तालीम सूरू आहे.
सदर प्रात्यक्षिक करते वेळी उद्भवलेल्या प्रसंगाला तात्काळ सामोरे जाणेसाठी दोन पोलीस अधिकारी व पंचवीस पोलीस अंमलदार व सहा होमगार्ड तात्काळ उपलब्ध झाले होते.त्यानंतर तेथेच मॉब डिस्पोझलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.जमाव विसर्जनाचे प्रात्यक्षिक पोहेकॉ.रमेश फुलमाळी यांनी पध्दतशीरपणे करून दाखवले हे प्रात्यक्षिक करते वेळी पोनि.संभाजी गायकवाड ,पोसई राजु थोरात ,जामखेड पोलीस स्टेशनचे २५ पोलीस अंमलदार व ६ होमगार्ड उपस्थित होते,मॉब डिस्पोजल प्रात्यक्षिक करतेवेळी १ डमी राऊंड फायर करण्यात आला आहे.तसेच सौम्य लाठीमार ही करण्याचा सराव करण्यात आला आहे.
एखादी घटना घडलेवरून तात्काळ पोलीसांचा प्रतिसाद मिळण्यासाठी तसेच येणा-या अडचणी जाणुन घेण्यासाठी दंगा काबु योजना व मॉब ड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले या प्रात्यक्षिकाला सर्वांचा चांगला प्रतिसाद तात्काळ मिळाला असुन तसेच इतर अधिकारी यांचीही मदत लवकरात लवकर मिळाली आहे.
यावरून दंगा काबु योजना राबविताना येणा-या अडचणी लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यात येथे पोलीस संख्याबळाची आवश्यकता भासत आहे.