राहुरी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गणेश आंबिलवादे यांनी संपादित केलेल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.देवळाली प्रवरा येथील ज्येष्ठ पत्रकार गणेश अंबिलवादे दरवर्षी व्हिजन महाराष्ट्र दिवाळी अंकाचे वाचकांसाठी सुपूर्त करतात. यंदाही या अंकाचे संपादन करून तो वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवेंद्र माळवे, व्हीझन महाराष्ट्रचे संपादक गणेश अंबिलवादे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे म्हणाले की, बदलत्या काळानुसार वाचक हा बदलत आहे. त्यानुसार त्याना जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हीझन महाराष्ट्र या अंकातून नेहमी पहावयास मिळतो.व्हिजन महाराष्ट्र हा दिवाळी अंक वाचकांना नेहमीच प्रेरणादायी ठरला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आभार गणेश आंबिलवादे यांनी मानले.