गणेश उत्सवात चांगले काम करणाऱ्या संघटनांचा जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या हस्ते गौरव

0

संगमनेर  :  गणेश उत्सव काळामध्ये शांतता ,प्रदूषण विरहित गणेश उत्सव यांसह विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलन त्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन यामध्ये मागील तीन वर्षापासून काम करणाऱ्या कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील एकविरा फाउंडेशनसह शहरातील विविध संघटनांचा शांतता कमिटीच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश उत्सव काळामध्ये सहकार्य आणि काम करणाऱ्या विविध संघटनांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व गटविकास अधिकारी अनिल नागणे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.एकविरा फाउंडेशनच्या वतीने मागील तीन वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मूर्तींचे संकलन करून त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. तसेच विविध ठिकाणी  निर्माल्य संकलन करून त्याची विल्हेवाट लावली जाते.स्वच्छता व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनने सातत्याने आदर्शवत भूमिका घेतली असून यामध्ये डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणींनी केलेले काम हे इतरांसाठी दिशादर्शक ठरले आहे. या कामाबद्दल प्रशासन व शांतता कमिटीच्या वतीने एकविरा फाउंडेशनच्या युवतींच्या गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here