गद्दारी आम्ही नाही तर बापाचे विचार विकून खरी गद्दारी तुम्हीच केली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई : ‘तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय म्हणायचं’ तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकण्याचा प्रयत्न केला, खरे गद्दार तुम्हीच आहात अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला . आम्ही तुमची सत्ता उलथवली म्हणता शिवसेना तुमची म्हणता , शिवसेना काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही . शिवसेना हि बाळासाहेबांच्या विचारातून आणि सर्व सामान्य शिवसैनिकांच्या घामातून तयार झाली आहे .
तुम्ही जे पाप केलं त्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या समाधीवर माफी मागावी असं एकनाथ शिंदे म्हणाले.आमच्या भूमिकेला जनसामान्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच या ठिकाणी इतकी गर्दी जमा झाली आहे. शेवटची व्यक्ती देखील दिसत नाहीये असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात केली.

“खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर या जनसागराने दिलं आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“हजारो शिवसैनिकांनी मिळून जो पक्ष उभारला तो आपल्या हव्यासासाठी गहाण टाकलात. तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचलात,” असा टोमणा एकनाथ शिंदेंनी लगावला.

शरद पवारांवर टीका “ज्या पक्षाचा उल्लेख बाळासाहेबांनी स्काउंड्रल्स असा केला होता त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली.”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले गेल्या तीन महिन्यांपासून मी लोकांमध्ये फिरतोय, सर्व ठिकाणी लहान थोर लोक आमच्या स्वागतासाठी उभे आहेत. जर आम्ही गद्दारी केली असती तर तुम्ही आमच्यासोबत आला असता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या लोकांना केला.

ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेंची नाही, तर ही शिवसेना केवळ शिवसैनिकांची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणाऱ्या लोकांची ही शिवसेना आहे.

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आणि शिलेदार आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ही गद्दारी नाही गदर आहे
एकनाथ शिंदे म्हणाले तुम्ही आम्हाला म्हणतात आम्ही गद्दार आहोत. पण ही गद्दारी नाही तर हा गदर आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार गहाण टाकलेत. तुम्ही म्हणतात बाप चोरणारी टोळी आली आहे, पण आम्ही असं म्हणावं का तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय म्हणायचं, असं एकनाथ शिंदेंनी विचारलं.

दहशतवादी याकुब मेननची फाशी रद्द करणाऱ्या लोकांना यांनी मंत्रिपद दिलं ही गद्दारी नाही का? असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मग तुम्ही का राजीनामे दिले नाहीत?
तुम्ही आम्हाला म्हणाले की आम्ही राजीनामे द्यावे आणि मग सत्तेत यावे, जेव्हा 2019 मध्ये तुम्ही जनादेश डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी तुम्ही राजीनामे दिले का?

“तुम्ही अडीच तास देखील मंत्रालयात गेला नाहीत, लोक तुम्हाला कंटाळले होते.”

“आज हिंदुस्तानात पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेत पण तुम्ही त्यावर एक चकार शब्द देखील बोलत नाहीत,” शिंदे म्हणाले.

तुम्ही पीएफआयवर एकही शब्द बोलला नाही, देशविघातक कारवाया करणाऱ्यांना मोकळं सोडलं जाणार नाही. पण तुम्ही त्यावर का बोलला नाहीत. अशा संघटनांचा बिमोड केला जाईल ही आमची भूमिका आहे.

पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आरएसएस वर बंदी घालावी अशी हास्यास्पद भूमिका घेतली आहे. ही कोणत्या राष्ट्रवादी नेत्याची भूमिका आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. देशाच्या उभारणीत आरएसएसचे मोठे योगदान आहे. प्रत्येक आपत्तीत त्यांनी लोकांची सेवा केली आहे हे आपण पाहिलं आहे असं शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here