गाण्यातला आनंद गाणे व्यक्त केल्यामुळे मिळतो : प्रकाश गवळी

0

सातारा/अनिल वीर : गाणे हे कधीही न संपणारे असते. त्यामुळेच गाण्यातला आनंद हा गाणे व्यक्त केल्यामुळे आपल्याला मिळतो.असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले.

                  येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व कराओंके सिंगर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजली म्हणून ‘ नगमा – ए – शैलेंद्र ‘ या सदाबहार हिंदी गाण्यांची सुश्राव्य गीत मैफिल दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी मार्गदर्शन करीर होते. यावेळी सागर पावशे, मसाप पुणे शहर प्रतिनिधी  शिरीष चिटणीस, सिंगर्स  क्लबचे संयोजक विजय साबळे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

              प्रकाश गवळी म्हणाले, “कोणतीही अपेक्षा न करता काहीतरी समाजाला द्यायचे असते.या उदात्त हेतूने शिरीष  चिटणीस यांनी गेली ३७ वर्ष व्रत म्हणून स्विकारले आहे . अविरतपणे कार्य करीत आहेत. सातारा येथे १९९३ साली संपन्न झालेल्या ६६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महत्त्वाचे योगदानही चिटणीस यांचे होते. सातारमध्ये सांस्कृतिक चळवळ आणि वाचक चळवळ अधिक वाढविण्यामध्येसुद्धा शिरीष चिटणीस यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.” 

                   शिरीष  चिटणीस म्हणाले ,” शैलेंद्र सारखा मोठा गीतकार – कवी  समीक्षकांच्या दुर्लक्षा मुळे उपेक्षित राहिला.ज्या काळात जातिव्यवस्था बळकट होती. त्या काळात गीतकार शैलेंद्र सारखा वर्णव्यवस्थेतला  माणूस येतो आणि आपल्या गीतांनी लोकांच्या मनाचा ठाव घेतो. एवढेच नव्हे तर समाज व्यवस्था बदलण्यासाठी त्यांच्या गीतांचा अजुनही उपयोग होतो. ही महत्वाची बाब आहे. त्यांनी रचलेली गीते अजुनही वर्षानुवर्षे समाजाला भुरळ पाडणारी आणि अंतर्मुख करणारी आहेत. त्यांची गाणी अजूनसुद्धा वर्षानुवर्ष चालणार आहेत. अर्थात, तुम्ही कुठल्याही व्यवस्थेत असलात  व तुमच्याकडे काही योग्यता असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. शैलेंद्र मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले. ते रावळपिंडीला होते. तिथून मथुरेत आले. मथुरेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे गाणे सुरू होते.त्यांची ती गाणी राज कपूरने मुंबईमध्ये ऐकली होती.तदनंतर राज कपूर यांनी त्यांना विनंती केली की, माझ्या चित्रपटासाठी तुम्ही गाणी लिहा. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता. परंतु पैशाची गरज भासल्यानंतर  त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली. त्यांची गाणी सोपी होती.तेव्हा या वर्षभरात त्यांच्या गाण्यावर परिसंवाद,चर्चा अशा गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे. विजय पाडळकर सारख्यांनी  शैलेंद्र यांच्यावर पुस्तक लिहिलेले आहे . अशी काही माणसं आपण हुडकून काढली पाहिजेत. एक आठवणीतले पुस्तक शैलेंद्रच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण सातारकरांनी सर्वांना भेट देऊया. तुमचे सर्वांचे सहकार्य त्यासाठी महत्त्वाचे आहे.  हिंदी संगीत परंपरा रूढी विसरायला लावते. गाणी व संगीत माणसाला संपन्न बनवते. लोकांना एकत्र आणण्यासाठी दिपलक्ष्मी पतसंस्था नेहमीच  प्रयत्न करत आहे.”

           नगमा – ए – शैलेंद्र या हिंदी गीतांच्या सुश्राव्य गीत मैफिलमध्ये सचिन शेरकर, सुधीर चव्हाण, बापूलाल सुतार, चंद्रशेखर बोकील, सुनील कारंजकर, अग्नेश शिंदे, शिवकुमार, सुहास पाटील, मंजुषा पोतनीस, सुनिता शालगर, स्मिता शेरकर, सुप्रिया चव्हाण, नीलम कुलकर्णी, कविता शिव कुमार आदी गायक कलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात सचिन शेवडे व अक्षदा शेवडे यांची ध्वनी  व्यवस्था  लाभली. कार्यक्रमाचे निवेदन बापूलाल सुतार यांनी केले.

      यावेळी मधुमती चित्रपटातील  “आजा रे परदेशी”  हे गाणे सुनिता शबनम यांनी सादर केले. राजकुमार चित्रपटांमधील  “आजा आई बहार ” हे गाणे मंजुषा पोतनीस यांनी सादर केले. या गाण्याच्या मुळ गायिका लता मंगेशकर या आहेत. आम्रपाली चित्रपटातील  “तुम्हे याद करते करते….”  हे गाणे सुप्रिया चव्हाण यांनी सादर केले. शंकर – जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले, “अजीब दासता है ये ”  हे गाणे कविता शिवकुमार यांनी सादर केले.  बरसात चित्रपटातील शंकर-जयकिशन यांचे संगीत लाभलेले “आजा मोरे बालमा तेरा इंतजार है”   हे गाणे नीलम कुलकर्णी यांनी सादर केले. अनाडी चित्रपटातील, “जीना इसी का नाम है।”  हे गाणे शिवकुमार यांनी सादर केले.अशा पद्धतीने गाण्यांची मैफिल उशिरापर्यंत रंगली होती.  न्यू दिल्ली चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘नखरेवाली’  हे गाणे सचिन शेरकर यांनी सादर केले. जागते रहो चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले “जिंदगी ख्वाब है”  हे गाणे विजय साबळे यांनी सादर केले. आशा भोसले व किशोर कुमार यांनी गायलेले “ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा”  हे गाणे कविता शिव कुमार व सुधीर चव्हाण यांनी सादर केले. गाईड चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत “दिन ढल जाये”  सुहास पाटील यांनी सादर केले. मोहम्मद रफी लता मंगेशकर यांनी गायलेले “मुझे कितना प्यार है तुमसे”  हे गाणे स्मिता शेरकर व चंद्रशेखर बोकील यांनी सादर केले. संगीतकार सचिन देव बर्मन यांचे संगीत लाभलेले, “क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में”   हे गाणे सचिन शेरकर यांनी सादर केले. असली-नकली चित्रपटातील मुळ गायिका लता मंगेशकर व शंकर-जयकिशन यांचे संगीत लाभलेले गाणे “तेरा मेरा प्यार अगर”  हे गीत स्मिता शेरकर यांनी सादर केले. गाईड चित्रपटातील “तेरे मेरे सपने अब एक रंग है”   हे गाणे बापूलाल सुतार यांनी सादर केले.  मधुमती चित्रपटातील मुळ गायिका लता मंगेशकर असलेले  “घडी घडी मोरा दिल धडके”   हे गाणी  सुप्रिया चव्हाण यांनी सादर केले. जिस देश मे गंगा बहती है या चित्रपटातील  “ओ बसंती पवन पागल” मुळ गायिका लता मंगेशकर  हे गाणे मंजूषा पोतनीस यांनी सादर केले. गाईड चित्रपटातील “गाता रहे मेरा दिल”  हे गाणे सुनील कारंजकर व नीलम कुलकर्णी यांनी सादर केले. मुकेश यांनी गायलेले ” दोस्त दोस्त ना रहा ” हे गाणे सचिन शेरकर  यांनी सादर केले . अनाडी चित्रपटातील शंकर – जयकिशन यांचे संगीत लाभलेले “सच है दुनियावालो के हम है अनाडी”  हे गाणे सुधीर चव्हाण यांनी सादर केले. अनाडी चित्रपटातील “दिल की नजर से” हे गीत विजय साबळे व स्मिता शेरकर, गाईड चित्रपटातील  “आज फिर जीने की तमन्ना है ” हे गीत मंजुषा पोतनीस, मोहम्मद रफी यांनी गायलेले “दिवाने का नाम तो पूछो”  हे गीत अग्नेश शिंदे,  मधुमती चित्रपटातील “दिल तडप तडप के कह रहा है”  हे गीत विजय साबळे व नीलम कुलकर्णी, सीमा चित्रपटातील ” तू प्यार का सागर है ” हे गीत चंद्रशेखर बोकील, चोरी चोरी चित्रपटातील “ये रात भीगी भीगी”  हे गाणे सचिन शेरकर व स्मिता शेरकर, तिसरी कसम चित्रपटातील  “सजनरे झुट मत बोलो”  हे गीत बापूलाल सुतार, पत्थर के सनम चित्रपटातील मूळ गायक मुकेश यांचे “हसीना तेरी मिसाल कहा”  हे गाणे मधुकर शेंबडे, आशिक चित्रपटातील   “तुम जो हमारे मीत ना होते ”   हे गीत तसेच  “ओ जाने वाले हो सके तो लौट के आना”   हे गीत  विजय साबळे यांनी सादर केले.

    सदरच्या कार्यक्रमास पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबर, अनिल चिटणीस, प्राचार्य वि.ना. लांडगे ,अशोक काळे, लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडा माळ’चे अध्यक्ष राजेश चिटणीस, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक प्रदीप लोहार, हणमंत खुडे, जगदीश खंडागळे, कल्याण भोसले, अनिल सुर्वे, डी. एम. पाटील, शेग्या गावित, शुभम बल्लाळ आदी उपस्थित होते.

फोटो : दिपप्रज्वन करताना प्रकाश गवळी शेजारी सागर पावसे,शिरीष चिटणीस व मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here