गुन्हा मागे घेण्यासाठी वरिष्ठांने लाच मागितल्याने पोलीस हवालदाराची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या ! 

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

               महिला पोलिसाने पोलिसावर दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी व विभागीय चौकशीतून सही सलामत बाहेर काढण्यासाठी 10 लाखाची साहय्यक पोलिस निरीक्षक साबळे यांनी मागणी केली. माझ्याकडे एवढे पैसे देण्यासाठी नाहीत असे सांगितले तेव्हा साबळे याने भोगा आपल्या कर्माची फळे असे बोलल्याने व मला खोट्या गुन्ह्यात गुंतवल्याने नैराश्य पत्कारुन मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी आघाव सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवला असता तर आज आघाव यांनी आज आत्महत्या केली नसती.साहय्यक पोलिस निरीक्षक  साबळे, साहय्यक पोलिस उपनिरीक्षक निमसे, मपोकॉ राऊत व शिवाजी फुंदे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी सांगीतले असुन पोलीस प्रशासन काय भुमीका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

          आज (शनिवारी) सकाळी पावणे दहा वाजता मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीच्या खोलीत आतून दरवाजा बंद करून पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. भाऊसाहेव आधाव यांनी चौकीच्या दाराला आतुन कडी लावून अत्महत्या केल्याचे दिसून येते राहुरी पोलीसांनी पंचा समक्ष चौकीचे दार लाथा मारून तोडून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणी साठी राहुरी येथे पाठविण्यात आला आहे. 

          आघाव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. या सुसाईड नोटने मोठी खळबळ उडविली आहे.पोलिसांनीच पोलिसाला खोट्या गुन्ह्यात अडकवून 10 लाखाची मागणी केली होती. परंतू दहा लाख देण्याची ऐपत नसल्याने आघाव याने सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली.सुसाईड नोट मध्ये आघाव यांनी सविस्तर माहिती लिहली आहे. 

त्या मध्ये मी पो.हे.काँ  259 भाऊसाहेब दगडु आघाव नेमनुक पोलीस मुख्यालय अहमदनगर सत्य प्रतीशिवर लीहून देतो की मी अजीत दादा पवार यांचे अकोला दौरा बंदोबस्ता करीता गेलो असता तेथे मला साहय्यक पोलिस निरीक्षक साबळे राजुर पोलिस स्टेशन येथे भेटले व म्हणाले की तुम्ही शेंडी औट पोष्टला असताना सर्व प्रकारचे दोन नंबर धंदे बंद केल्यामुळे माझे 5 लाखाचे नुकसान झाले. साबळे म्हणाले की मीच  साहय्यक पोलिस उपनिरीक्षक निमसे याना हाताशी धरून व म पो.कॉ  राऊत यांच्या मदतीने तुमचे विरुद्द विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. यागुन्ह्यानंतर मला दोन नंबर धंद्यावाल्याकडून पैसे चालु झाले आहे.विनयभंग व विभागीय चौकशी मागे घेण्यासाठी आणि माझे झालेले नुकसान असे मिळून तुम्ही  मला 10 लाख रुपये द्या तरच  तुम्हाला मी या गुन्हायातुन सोडवतो. तेव्हा मी त्यांना म्हणालो 10 लाख रुपये कशाचे तेव्हा  साबळे म्हणाले की माझे 5 लाख,विनयभंगाचा  गुन्हा दाखल करण्या साठी साहय्यक पोलिस उपनिरीक्षक निमसे यांना 3 लाख व महिला पोलिस काँ.राऊत यांना विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याशी तयार केले म्हणुन 2 लाख असे 10 लाख व तुमची विभागीय चौकशी चालु आहे  त्यातुन बाहेर काढणे साठी,चौकशीचे काम पहाणारे शिवाजी फुंदे यांना 1 लाख रुपये द्या त्यावर मी म्हणालो माझे कडे इतके पैसे नाहीत. व मि निघुन गेलो नंतर माझा चौकशी अहवाल आला मला फुंदे यांनी बोलावून सांगीतले तुमचा चौकशी अहवाल आला आहे मी तुम्हाला यातुन सुखरूप बाहेर काढतो. तुम्ही साबळे  यांनी सांगितले प्रमाणे करून टाका तेव्हा मी त्यांना म्हणालो माझ्याकडे  पैसे नाहीत. त्यावर  ते म्हणाले मग भोगा. यासर्व प्रकारा नंतर मी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या समोर हा सर्व प्रकार सांगीतला. पोलिस अधिक्षक यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. आपल्या मागे कोणी ही उभे राहु शकत नाही. त्यामुळे पुर्णपणे हाताश झालो त्यामुळे स्वःताला संपवत आहे. माझ्या मरणास सहाय्यक पोलिस निरीक्षक  साबळे, साहय्यक पोलिस उपनिरीक्षक निमसे, महिला पोलिस कॉ. राऊत व शिवाजी फुंदे हेच जबाबदार असल्याचे आत्महत्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत लिहुन ठेवले आहे.

              आघाव हे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेत अनेक वर्ष काम केले. त्यांच्या कामाची पद्धत चांगली असल्याने जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात त्यांचा सहभाग होता.

           घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, जलसंपदा खात्याचे उप अभियंता शरद कांबळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील घटनास्थळी भेट दिली.

             आघाव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठी मुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली. मयत हवालदार आघाव यांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्यांना अटक झाल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी सांगीतले असुन पोलीस प्रशासन काय  भुमीका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here