उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ) : मुंबई चर्च गेट, आय. एम सी येथे झालेल्या महाराष्ट्र लोक कल्याण सेवा संस्था व अमरदीप बाळ विकास फाऊंडेशन याच्या विद्यमाने आसनास हेल्थकेअर एज्युकेशन फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अनमोल रत्न अवॉर्डने अनेकांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्यांना एकूण देशातून 80 जणांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देण्यासाठी पदमश्री डॉ रमाकांत देशपांडे, पदमश्री डाँ मुकेश बात्रा,अभिनेता कायवंत सावरकर,हौडो होंग राजदूत कोरिया,आणतोन पाषको राजदूत बेलारुस,डॉ अमजद खान पठाण,एन. डी खान,सलमा खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक गोपाळ म्हात्रे यांना अनमोल रत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अनिल वीर सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६७ वा वर्धापन दिन येथील शिवछत्रपतींच्या राजधानीमध्ये व माता भिमाईच्या जन्मभूमीमध्ये पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )
महात्मा गांधी जयंती निमित्त नगर परिषद क्षेत्रात २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. उरण नगर परिषदेच्या...
साकुरी येथे बुद्धविहार इमारत बांधकामाचे भूमिपूजन*
शिर्डी, दि.२ :- राहाता तालुक्यातील सर्व गावांमध्ये सामाजिक सभागृहांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन...