गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला ; नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0

संगमनेर : वारंवार कारवाई होऊन देखील संगमनेरच्या कुप्रसिद्ध असणाऱ्या कत्तरखान्यांमधून जनावरांची सर्रास कत्तल सुरू आहे. बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी पहाटे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात टेम्पोतून विक्रीसाठी जात असणारे सुमारे दोन लाख रुपयाचे गोमांस आणि वाहतूक करणारा टेम्पो शहर पोलिसांनी जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

            पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो मधून गोमांस विक्रीसाठी जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी समनापुर बायपास जवळ सापळा रचला. या सापळ्यात सुमारे दोन लाखाचे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एम.एच ४३ ए.डी ९२४३ पोलिसांनी अलगद पकडला. त्यानंतर सुमारे दोन लाखाचे गोमांस आणि टेम्पो असा नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत शाबान अली हुकूम अली शहा (रा. गोवंडी, मुंबई) आणि तोहीद दोस्त मोहम्मद पठाण (रा. आळे, तालुका जुन्नर) या दोघांना बेड्या ठोकत अटक केली आहे. दरम्यान वारंवार पोलीस कारवाया होऊन देखील संगमनेरचे कुप्रसिद्ध कत्तलखाने सुरूच असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here