गौरव अरुण म्हात्रे यांची शिवसेना उलवे नोड(पश्चिम विभाग) शहरप्रमुख पदी नियुक्ति.

0

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )

 हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे  यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटिल यांच्या मार्गदर्शनानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी गौरव अरुण म्हात्रे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (शिवसेना पक्षाच्या) उलवे नोड (पश्चिम विभाग) शहरप्रमुख पदी नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उलवे नोड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (शिवसेना पक्ष) बांधणीसाठी मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन केले.

  उलवे नोड(पूर्व विभाग) शहरप्रमुख  प्रथमेश पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, वहाळ शाखाप्रमुख  सुधीर घरत, सम्राट घरत व  गणेश घरत आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.गौरव म्हात्रे हे शिवसेनेचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून या नियुक्ती बद्दल गौरव म्हात्रे यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here