ग्रामपंचायत विंधणे कडून आठ गावातील अंत्यविधीसाठी लागणारा जळाऊ लाकूड व इतर सामुग्री मोफत मिळणार – सरपंच निसर्गा रोशन डाकी 

0

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील विंधणे ग्रामपंचायत कडून ग्रामपंचायत हद्दीतील आठ गावातील नागरिकांचे निधन झाल्यास नागरिकांच्या अंत्यविधीसाठी लागणारा लाकूड तसेच इतर सामुग्रीचा खर्च ग्रुप ग्रामपंचायत विंधणे यांच्याकडून मोफत करण्यात येणार आहे.पंचायतराज मध्ये ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958  कलम 7 अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील विंधणे ग्रामसभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली असून विंधने, धाकटी जुई, बोरखार,नवापाडा, टाकी गाव, विंधणे खालचा पाडा, कंठवली,कंठवली कातकरवाडी, विंधणे कातकरवाडी तसेच कंठवली कातकरवाडी या गावांचा समावेश आहे. या निर्णयाबद्दल विंधणे ग्रामपंचायतच्या सरपंच निसर्गा रोशन डाकी तसेच उपसरपंच भारत नरेश डाकी त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या शुभांगी जोशी, सूरज म्हात्रे, दिपाली म्हसकर,  मंगेश घरत, रोहीत नाईक, सुनिता पाटील, मनिषा कोळी,मंजुळा  नवाळी, प्रमोद शेळके,  दिपक कातकरी,लक्ष्मी पाटील,संगीता पाटील, ग्रामसेवक आर बी गावंड  यांचे कौतुक केले जात आहे. या निर्णयाचे सर्व गावांमध्ये चर्चा होत असून विंधणे ग्रामपंचायत कडून सर्व ग्रामपंचायतने प्रेरणा घ्यावी असा आदर्श विंधणे ग्रामपंचायतीने सर्वांसमोर ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here