घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

0

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )

दिनांक ०२/१०/२०२२ रोजी एकविरा कला संस्था,भुमीपूत्र संघटना केळवणे आणि प्रसिद्ध गायक तेजस पाटील(केळवणे )यांच्या माध्यमातून

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धाचे आयोजन केळवणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक रात्र वास्तव केलेले गावदेवी भवानी माता मंदिर केळवणे येथे केले होते.आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज रायगडाहून कल्याण दिशेला मोहीमेवर जात असताना रात्र झाली म्हणून महाराजांनी येथे राहण्याचे ठरवले तेव्हा याच ठिकाणी आई भवानी ने त्यांना द्रुष्टांत दिला व मुर्ती सापडल्या आणि मग महाराजांनी येथे आई भवानी व आई रेणुका ची स्थापना केले. अश्या या परिसरात कार्यक्रमाचा  पारितोषिक वितरण सोहळा व गावातील विशेष व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाला पेण चे उद्योजक यशवंत दादा घासे ,मीनीडोर चालक मालक संघटना अध्यक्ष विजय भाऊ पाटील ,२९ गाव समीती नवी मुंबई अध्यक्ष दिपक पाटील,जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच जे.आर.पाटील,मच्छीमार संघटना अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे ,सरपंच अश्विनी ताई घरत ,उपसरपंच शर्मिला माळी,जयश्री ज्ञानेश्वर घरत ,बी.के.पाटील, मधुकर पाटील, दत्तात्रेय पाटील,आदेश पाटील, बाळकृष्ण शेडगे,गजानन पाटील गुरूजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तेजस पाटील यांनी प्रस्तावना सादर केली.नंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा व सत्कार समारंभ करण्यात आला. मखर सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्जुन पाटील(चलचित्र- पंढरीची वारी),दुसरा क्रमांक हनुमान पाटील(एकविरा लेणी),तिसरा क्रमांक संदीप कडू (शिवगुफा) यांनी पटकविला.विजेते उमेदवारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी गायिका श्वेता ठाकूर,गिरीश म्हात्रे, सोमनाथ कोळी,चिंतामणी शिवडीकर, राजेश खर्डे, देव घरत,नाँडी रसाळ,प्रशांत ठोंबरे,स्नेहा पाटील, स्नेहल पाटील, विंट्या म्हात्रे, समाधान फोफेरकर, ह्रदया जाधव,प्रतिक कोळी,तेजू पाटील आदी कलाकार मंडळी उपस्थिती होती.सदर कार्यक्रम अत्यंत भव्य स्वरुपात करण्यात आला.शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते.

समीर ठाकूर यांनी उत्तम निवेदन केले.डीजे प्रफुल ने साऊंड व्यवस्था केली.कांता गावंड आणि सागर ठाकूर यांनी संयोजन केले.सदर कार्यक्रमात समीर ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.एकंदरीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here