चांदेकसारे येथे महिलाबचतगटांना ७८ लाख रूपयांचे कर्ज वितरण-सौ. स्नेहलताताई कोल्हे

0

कोपरगांव :- दि. ६ ऑक्टोंबर २०२२

        आजची बचत ही भविष्याची मोठी तरतुद असते, महिलाभगिनी संसार प्रपंचाचा गाडा हाकतांना त्यातुन काही रक्कम बाजुला ठेवुन मोठी उलाढाल करतात, हया भगिनी बचतगटाच्या माध्यमांतून सक्षम होतांनाचा आनंद निराळाच असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. 

             तालुक्यातील चांदेकसारे येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सामाजिक सभागृहात २९ महिला बचतगटांना सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गुरूवारी बॅक ऑफ इंडिया चांदेकसारे व इंडीयन ओव्हरसिज बँक पोहेगांव यांच्या माध्यमांतून कोपरगांव तालुका स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्यावतीने ७८ लाख ७० हजार रूपयांचे कर्जवितरण करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

           प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष संजय होन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बँक ऑफ इंडिया चांदेकसारे शाखेचे व्यवस्थापक ऋषीकेश तापकीर व इंडियन ओव्हरसिज बँकेचे व्यवस्थापक प्रविण आहेर यांनी बँक प्रगतीची माहिती देवुन महिलांसह शेतकरी व गरजवंतांनी कर्जाचा योग्य विनीयोग करून त्याची मुदतीत परतफेड करावी असे सांगितले. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचा वाढदिवसानिमीत्त महिलाबचतगट पदाधिका-यांनी सत्कार केला. 

          सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील महिला भगिनींनी बचतीतून आपली पत निर्माण केली आहे. आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात महिलामंडळ आहे त्यातुन थेट विधीमंडळात काम करण्यांची संधी मिळाली. वंचित घटकांचे, समाजाचे, गोर-गरीब सर्वसामान्य मागासवर्गीय यासह तालुक्याच्या विकासाचे अनंत प्रश्न मार्गी लावुन प्रस्तावीत कामांस निधी मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. चांदेकसारे पंचक्रोशीवासियांनी आपल्या वाढदिवसाला दिलेली भेट अनमोल आहे. वाढदिवसापेक्षा आपण नेहमीच समाजकार्याला महत्व देवुन सत्कार्याला प्राधान्य दिले.

           याप्रसंगी सौ. लताताई संजयराव होन, संगिता होन, केशव होन, सारिका होन, विलास होन, जिल्हा बँक बचतगट समन्वयक शिंदे, ग्रामसेवक सुकेकर यांच्यासह चांदेकसारे पोहेगांव पंचक्रोशीतील महिला बचतगटाच्या भगिनी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

फोटोओळी- कोपरगांव 

          चांदेकसारे येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सामाजिक सभागृहात २९ महिला बचतगटांना बँक ऑफ इंडिया चांदेकसारे व इंडीयन ओव्हरसिज बँक पोहेगांव यांच्या माध्यमांतून भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते ७८ लाख ७० हजार रूपयांचे कर्जवितरण करण्यांत आले. (छाया – जय जनार्दन फोटो, संजीवनी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here