चिंतामणी पार्श्वनाथ सहकारी पतसंस्थेची  पोलीस चौकशी सुरु.  

0

फलटण प्रतिनिधी                                येथील  श्री १००८चिंतामणी पार्श्वनाथ बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेची पोलीस चौकशी सुरु झाली  आहे. रविवार दि. 30 ऑक्टोबर 22 रोजी वरील पतसंस्थेचे  अध्यक्ष  नितीन कोठारी यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत तपासासाठी फलटण येथे आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या निवासस्थानातून काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. तसेच आर्थिक  गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांनी कोठारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून पतसंस्था अडचणीत येण्यामागची कारणे विचारली  असता त्यांनी समर्पक आणि समाधानकारक उत्तरे न दिल्याने कोठारी यांना सज्जड भाषेत सुनावले आणि तपासामध्ये सहकार्य करण्याची सूचना केली.यावेळी  आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि शिवाजी भोसले यांच्या सह त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच त्यावेळी कोठारी यांचा मुलगा आणि मुलगी उपस्थित होते. कोठारी यांना फलटणला आणले आहे असे समजल्यावर बरेचसे ठेवीदार त्या ठिकाणी गोळा झाले होते. कोठारी यांना अटक झाल्यामुळे ठेवीचे पैसे परत मिळण्यासाठी थोडी आशा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तर उर्वरित फरारी संचालकांना लवकरच अटक केली जाईल असे भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here