जय दुर्गा नवरात्रौत्सव मंडळ गोवठणे तर्फे नवरात्रौत्सव साजरा.

0
उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे)उरण तालुक्यातील गोवठणे गावात श्री गणेश मंदिराजवळ सोमवार दि 26/9/2022 रोजी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना जय दुर्गा नवरात्रौत्सव मंडळ गावठणेच्या माध्यमातून झाली असून देवीची आरती, विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत.गोवठने गावातील सर्व समाजातील व्यक्तींनी आपापसात असलेले राग द्वेष, भांडणे विसरून एकत्र यावेत. गावात सामाजिक सलोखा, प्रेम वाढीस लागावा या दृष्टी कोणातून सामाजिक कार्यकर्ते महेश वर्तक यांनी इस 1995 साली जय दुर्गा नवरात्रौत्सव मंडळ गोवठणेची स्थापना केली . तेव्हापासून आज‌तागायत गोवठणे गावात नवरात्रौत्सव अखंड सुरु आहे.हे मंडळ उरण तालुक्यातील पूर्व विभागातील सर्वात जुने व पहिले नवरात्रौत्सव मंडळ आहे. या मंडळाच्या स्थापने नंतरच इतर मंडळानी पूर्व विभागात सार्वजनिक नवरात्रौत्सव सुरु केला.जय दुर्गा नवरात्रौत्सव मंडळ गावठणेचे संस्थापक अध्यक्ष महेश वर्तक, अध्यक्ष गिरीश पाटील, उपाध्यक्ष तेजस म्हात्रे, कार्याध्यक्ष अरुण कडू,सह कार्याध्यक्ष किरण पाटील,खजिनदार अनिल पाटील, सचिव किरण म्हात्रे,सदस्य- मनोज पाटिल , राजेंद्र पाटील, गणेश पाटील, श्याम म्हात्रे, मधुकर म्हात्रे, गुरुकृपा मित्र मंडळ गोवठनेचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी सदस्य हे नवरात्रौत्सव उत्साहात संपन्न व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here