जामखेड चे माजी सरपंच प्रा. कैलास माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे पहिले जामखेड तालुका प्रमुख

0

जामखेड तालुका प्रतिनिधी –  जामखेड चे माजी सरपंच प्रा. कैलास माने, पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी राष्ट्रीय पक्षाला ‘ सोडचिठ्ठी ‘ देऊन प्रादेशिक पक्षात प्रवेश करुन सक्रिय राजकारणाला सुरुवात केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे ते पहिले तालुका प्रमुख ठरले आहेत.

प्रा. कैलास माने यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेने पासून झाली ‘मनसे’ ची जामखेड तालुक्याची संपूर्ण धुरा प्रा. कैलास माने यांच्या हाती होती . प्रा. माने यांनी जामखेड मध्ये मनसेची मोठी ताकद निर्माण केली.त्यातूनच त्यांनी ग्रामपंचायतची निवडणूकीत ‘मनसे’ च्या माध्यमातून पँनल उतरवले आणि सत्ताही मिळविली. मनसेला महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा पहिले सरपंच होण्याचा मान प्रा. कैलास माने यांच्या नावावर नोंदविला गेला. त्याची दखल दस्तुरखुद्द मनसे चे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती.

<p>‘मनसे’ मध्ये राजकारणाची घोडदौड चांगली सुरू असतानाच ; ग्रामपंचायतीचा कारभार करताना निर्माण झालेल्या आडचणींमुळे राज्यातील सत्तेने त्यांना खुनावले. तात्कालीन महसूलमंत्री मंत्री आणि काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. त्यातूनच मानेंनी  ‘मनसे’ च्या रेल्वेला ‘टाटा’ करीत काँगेसचा ‘हात’ हाती धरला. काँग्रेसनेही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कैलास माने यांच्या सौभाग्यवतींना जामखेड जिल्हा परिषद गटातून निवडणूकीच्या रिंगणात उतरविले. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे माने यांना निवडणुकीत ‘यश’ आले नाही . अखेर गटबाजीला कंटाळून कैलास माने यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘कमळा’ ची साथ धरली.

नगरपालिकेच्या निवडणूकीत प्रा. कैलास माने यांनी भाजपा च्या तिकिटावर निवडणूकही लढविली. मात्र एकाच वेळी पती- पत्नी दोन निरनिराळ्या प्रभागात उभे राहिले. मानेंची राजकीय ताकद विभागली गेली आणि त्यांना दोन्ही ठिकाणी यशाने हुलकावणी दिली. नगरपालिकेत कोण जिंकले याही पेक्षा माने हरले, याचीच अधिक चर्चा झाली. नगरपालिकेच्या निवडणूकीनंतर  मानेंची भाजपातही घुसमट झाली. ते तेथेही फार काळ रमले नाहीत.

<p>राजकीय अस्थिरतेमधून त्यांचा राजकारणातील नवीन वाटेचा शोध सुरूच होता.तसाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा जामखेडच्या तालुका प्रमुख पदाचा शोध सुरू होता.अनेकांना या पदाचे डोहाळेही लागले होते मात्र सर्वांचे अंदाज चुकले आणि ही कमान कैलास माने यांच्या खांद्यावर सोपवण्या चा निर्णय शिंदे गटाच्या नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आणि कैलास माने यांना शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या सहीने जामखेड तालुका शिवसेना प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

कैलास माने यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेला जामखेड तालुक्यात दमदार नेतृत्व मिळाले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. कैलास माने यांच्या माध्यमातून ‘ शिंदे गटाची शिवसेना ‘ वाटचाल करील. कैलास माने यांच्यासमोर पहिलं लक्ष जामखेड नगरपालिका निवडणूकीच राहील.

जामखेडच्या राजकारणात प्रा. कैलास मानेंचा ‘करिष्मा’ एकेकाळी चालला. त्यावेळी कैलास माने यांनी ‘मनसे’ च्या माध्यमातून युवा फळी ला बरोबर घेऊन जामखेड ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. सत्ता ही मिळविली होती. त्याचीच पुनरावृत्ती जामखेड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते करतील काय ? याकडे जामखेड शहरातील सर्वांचेच लक्ष लागले आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here