जामखेड तालुका प्रतिनिधी. – जामखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या प्रमाण पत्र वाटपाचा कार्यक्रम प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने मँथ्स् वर्ल्ड एज्युकेशन संस्थेत आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांग बांधवासाठी शासन स्तरावर विविध योजना आहेत .या मध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ तसेच अपंग कल्याण या योजनेचा जामखेड तालुक्यातील अपंग बांधवानी लाभ घ्यावा तसेच या अपंग गोर – गरीब जनतेच्या मदतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. महसूल प्रशासनाकडे जे – जे प्रस्ताव प्राप्त होतील त्या सर्वांना ताबडतोब मंजुरी देण्यात येईल असे मत नायब तहसिलदार पाचारणे यांनी व्यक्त केले.
<p>यावेळी प्रहारचे उगले म्हणाले, दिव्यांग व अपंगाची सेवा करताना आनंद मिळतो, प्रहार चे सर्वच कार्यकर्ते यासाठी आग्रही असतात , तळागाळातिल दिव्यांग बांधवासाठी प्रहार सतत कार्यशील आहे.
यावेळी सुभेदार म्हणाले, आम्ही करत असलेल्या कामात आम्हाला प्रशासकीय पातळीवर खूप सारी मदत मिळते. जिल्ह्यात दिव्यांगा साठी जामखेड तालुक्या चे फार मोठे काम आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर आम्हाला मार्गदर्शन व सहकार्य केले जाते.
<p>यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष नायब तहसिलदार पाचारणे, वैद्यकीय अधिक्षक शंशाक वाघमारे प्रहार चे ता.अध्यक्ष जयसिंग उगले, शहराध्यक्ष नय्युम सुभेदार , प्रा. धनंजय भोसले, विधाते मॅडम, शबनम सय्यद , सचिन उगले , यादव क्षिरसागर यांच्या सह आदी मान्यवर कार्यकर्ते व बहुसंख्येने दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दिव्यांगाना मागील २ महिन्यापूर्वी ग्रामीण रुगणालय येथे झालेल्या अपंग मेळाव्यातील प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र स्टेट मधील वीसवी सीनियर वुशु चॅम्पियनशिप आठ ते आकरा ऑगस्ट कोपरगाव येथे झाली होती. त्या चॅम्पियनशिप मध्ये शादाब शेख यांनी गोल्ड मेडल मिळविले आहे आणि त्यांनी जम्मू कश्मीर येथे होणारे नॅशनल वुशु चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
Attachments area
