पैठण,दिं.१७ : पैठण येथील नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात २७ वक्र दरवाजातून १०८४६८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
नाशिक, अहमदनगर व औंरगाबाद या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदीपात्रातील विसर्गा मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून गोदावरी नदी काठावरील गावाच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागागीय अभियंता अशोक चव्हाण,धरण अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर,अब्दूल बारी गाजी, आबासाहेब गरूड, अप्पासाहेब तुजारे,बंडू अंधारे, प्रभाकर तांगडे सह अधिकारी कर्मचारी पुरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
<p>——-
जायकवाडी नाथसागर मधून तिसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्यामुळे कावसान गावाचा पुल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे तर पैठण शेवगाव रस्त्यावरील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाला खेटून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग जात आहे येथील पुल हा फार जुना आहे.
——–
छायाचित्र : गजेंद्र पाटील, पैठण