जायकवाडी नाथसागर प्रकल्प १०० टक्के भरल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 

0

पैठण,दिं.१४: मराठवाड्यासाठी भगिरथ म्हणून ओळखला जाणारा पैठण येथील जायकवाडी नाथसागर प्रकल्प गुरूवार दिं.१३ रोजी १०० टक्के भरल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने शेती, पिण्याचे पाणी सह औद्योगिक वसाहतीसाठी लागणा-या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

   गेल्या २५ जुलै पासून नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात धरणाच्या वक्रव्दारा मधुन चालू असलेला विसर्ग धरणाच्या ईतिसाहासा मधील सर्वोच्च ऐतिहासिक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आत्तापर्यंत ४ हजार  ६९१.०६२८ दलघमी पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात आजपावेतो करण्यात आला तर एकूण नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग १६५.६४ टिएमसी एवढा झालेला आहे सध्या धरणा मध्ये १०२ टिएमसी पाणीसाठा असून यावर्षी एकूण पाण्याची आवक २२१.३५ टिएमसी इतकी झाली आहे सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा ७६ टिएमसी आहे तर मृतपाणीसाठा २६ टिएमसी असून धरणात एकूण सध्या १०२ टिएमसी पाणीसाठा आहे. 

धरणाच्या ईतिसामधील सर्वात मोठे पुरनियंत्रनाचे जिकिरीचे काम जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या प्रशासकीय अधिका-यांनी महसूल, पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयकपुर्वक तथा कुशलतेने पार पाडले गेल्या चार वर्षांपासून जायकवाडी नाथसागर सतत भरत असल्या कारणाने आपत्तीव्यवस्थापन व पुरनियंत्राचे काम वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखी लाभक्षेत्र विकास औंरगाबादचे मुख्य अभियंता तथा मुख्य प्रशासक बी के गवळी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता व प्रशासक समाधान सब्बीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागागीय अभियंता अशोक चव्हाण, उपविभागागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट,धरण अभियंता विजय काकडे, बंडू अंधारे, गणेश वाघ,बालचंद अजमेरा, गणेश खराडकर,अब्दुल बारी गाजी, अप्पासाहेब तुजारे, आबासाहेब गरूड, प्रभाकर तांगडे, रामनाथ तांबे, शेषराव अडसूळ, पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस जमादार विष्णु गायके, सहाय्यक फौजदार साहेबराव दळवी, पंडित खाडे सह आदी कर्मचारी प्रशासनाचे काम चोखपणे पार पाडत आहेत.

——–

फोटो : पैठण : नाथसागर जलाशयातून अठरा दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी तर दुसऱ्या फोटो मध्ये पाणीसाठा दर्शविणारी पट्टी.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here