उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकत असलेले आणि फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे एचएससी बोर्डाचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदुर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला . रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी अध्यक्षांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस एस मॅडम तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख शिंदे एस .एस .बारावीचे विज्ञान शाखेचे वर्गशिक्षक प्रा. देवरे सर व बारावी कला वर्गशिक्षक प्रा.समीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे फॉर्म भरण्या संदर्भात मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या .