जासई विद्यालयांमध्ये ज्युनिअर कॉलेज चा पालक मेळावा संपन्न.

0

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज,जासई. या विद्यालयात इयत्ता 12 वी वर्गांचा पालक मेळावा संपन्न झाला.

     शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील तसेच विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे व इतर मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी केले आणि ही पालक सभा आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला.

      सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या सर्व वर्गांचे पालक मेळावे विद्यालयात पार पडले आहेत .शाळेच्या शिस्तीसाठी, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालकांचे सहकार्य मिळविण्याच्या हेतूने ह्या पालक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते.पालकांचे उद्बोधन करण्यासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नूरा शेख तसेच ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख  शिंदे एस. एस, गुरुकुल प्रमुख म्हात्रे जी.आर, प्राध्यापक अतुल पाटील,सर्व वर्गशिक्षक यांनी मार्गदर्शन केले.या पालक सभेसाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा.दिपक शेडगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here