जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार.

0

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे ) शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेमार्फत 4 ऑक्टोबर 2022 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या नावे दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार उरण तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई या विद्यालयास प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांना प्रदान करण्यात आला.त्यांच्या समवेत विद्यालयाचे चेअरमन चे अरुण जगे,विभागीय अधिकारी आर.पी. ठाकूर, रयत सेवक संघाचे समन्वयक नुरा शेख, लेखनिक सुरेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here