सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा व तत्सम विवीध संघटनेच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी धम्मक्रप्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महामानवांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंदडाईत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर धम्म ध्वजारोहन भन्ते कौंडिण्य यांच्या हस्ते करण्यात आले.नंदकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाने सलामी दिली. यावेळी सामूहीक धम्म वंदना व सुत्र पठण जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. यावेळी विजयादशमीच्या शुभेच्छापर मनोगत केंद्रीय शिक्षक भागवत भोसले, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, संघादित्य आदींनी व्यक्त केले. यानंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शहरांतून श्रामणेर संघाच्या मार्गदर्शनाखाली रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.डॉ.आंबेडकर यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छ.शिवाजी महाराज आदींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. भिक्खू संघाने मिरवणूकीची सांगता मिलिंद कॉलनीमधील सभागृहात करण्यात आली. यावेळी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सादर केले. सदरच्या कार्यक्रमास जिल्हा व तालुका महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह वंचित, रिपब्लिकन सेना,वंचित संघर्ष मोर्चा,त्रिरत्न संघ,धम्मबांधव उत्सव कमिटी,राष्ट्रोत्सव संयोजन समिती आदी राजकीय, सामाजिक,धार्मिक आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. दरम्यान,पाटण येथे भीमराव दाभाडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाबळेश्वर येथे महासभेचे तालुकाध्यक्ष आर.जी.यादव व विविध संघटनांच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविहार येथे विविध उपक्रमाने धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. असेच वृत्त जिल्ह्यातील प्रत्येक महासभेच्या तालुकाध्यक्ष यांच्या नियोजनाखाली शहर व गावागावात साजरा केल्याचे वृत्त आहे.
फोटो : ध्वजारोहनप्रसंगी मान्यवर व कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)