सातारा : जिल्ह्याचा विस्तार पाहता पूर्व व पश्चिम विभागासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष अशी निवड केली आहे.तरीही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित पदाधिकारी एकवाक्यता ठेवुन धम्माचा गाढा अश्वगतीने पुढे घेऊन जातील.असे गौरवोद्गार तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने यांनी काढले.
येथील सांस्कृतिक भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी यांचा तालुका शाखेच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा अध्यक्षस्थानावरून तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने मार्गदर्शन करीत होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी भागवत भोसले (पश्चिम) व बाळासाहेब जाधव (पूर्व),पश्चिम जिल्हा कोषाध्यक्ष विद्याधर गायकवाड व जिल्हा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार काळे आदींचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. सातारा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या उत्साही टीमने तत्परता दाखवून सत्काराचे आयोजन केले होते.कराड येथे महाविहारमध्ये जिल्हा कार्यकारिणी यांची निवड झाली होती. दुसऱ्याच दिवशी सातारा येथील मिलिंद कॉलनीधील सांस्कृतिक भवनमध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला होता. बाहेर तर पाऊस धो-धो पडत होता. तरीही आनंदाचा पारावार उत्तरोत्तर बहरतच होता. नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यावर पुष्यमालेसह,पुष्पगुच्छ व शब्द सुमनांचाही वर्षाव मान्यवर करीत होते.प्रथमतः बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते सत्कार झाला.तदनंतर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने व इतर मान्यवरांच्या हस्तेही पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, विकास तोडकर, दिलीप फणसे, साहित्यिक प्रकाश काशिळकर, मंगेश डावरे,दिलीप सावंत,शाहिर यशवंत भाले, मनोज वाघमारे आदींनी शुभेच्छा दिल्या.सत्कारास उत्तर नंदकुमार काळे, बाळासाहेब जाधव, विद्याधर गायकवाड आणि भागवत भोसले यांनी दिले. ॲड. विजयानंद कांबळे यांनी सुत्रसंचालन केले.अजित कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास नंदकुमार काळे यांच्या परिवारातील मुलगा, सुन,नातू आणि विद्याधर गायकवाड यांच्या मुलाची उपस्थिती लक्षणीय ठरली. याशिवाय,विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,उपासक उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
फोटो : भागवत भोसले यांचा सत्कार करताना आबासाहेब दणाने शेजारी नवनिर्वाचित पदाधिकारी,ऍड.कांबळे व खंडाईत.(छाया-अनिल वीर)