जे एन पी टी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराने घेतला एक निष्पाप नागरिकाचा नाहक बळी.

0

उरण  दि 13(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील जसखार गावच्या पच्छिमेस चालू असलेल्या NHAI च्या महामार्ग मुळे तेथील रस्ता लगत असणाऱ्या वास्तूंना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना सर्व ग्रामस्थांचां विरोध असून देखील सरकारी यंत्रणाला हाताशी धरून जे कुमार कंपंनी चे काम बिनधास्तपने चालू आहे.ग्रामस्थांनी ग्रामपंचायत जसखार तसेच युवा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अनेक पत्रव्यवहार आंदोलने करून शासकीय यंत्रणा यांना सदर कामामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या यांची जाणीव करून दिली. परंतु जे एन पी टी प्रशासन यांनी कोणतीही बाब गांभीर्य पूर्वक घेतली नाही.सतत ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नाकडे दु्लक्ष केले आहे.याच नियोजन शुन्य कारभार मुळे मागील आठवड्यात सदर कामाच्या ठिकाणी कै. कमलाकर विठ्ल ठाकूर आपल्या नातीला शाळेत दुचाकी घेऊन जात होते.ते जात असताना सदर ब्रीज महामार्गचे काम चालू असलेल्या ठिकाणी अपुऱ्या सुरक्षितता साधना अभावी त्याचा दुचाकी वरून अपघात झाला. त्यांच्या डोक्यास व पायाला गंभीर दुखापत झाली. व त्यांना एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे अतिदक्षता विभागात उपचार साठी दाखल करण्यात आले.

        सदर अपघाताची बातमी कळल्या बरोबर ग्रामपंचायतच्या वतीने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला मेडिकल सुविधा व सदर महामार्गाचे ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती.परंतु जे एन पी टी किंवा ठेकेदार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही किंवा कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.परिणामी अपघातग्रस्त नागरिक कमलाकर ठाकूर यांना हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान  मृत घोषित करण्यात आले.परिणामी त्यांच्या कुटुंबा मध्ये शोककळा पसरली. जे एन पी टी च्या या नियोजन शून्य कारभार याचा सर्व स्तरावर निषेध व्यक्त होत आहे.जे एन पी टी प्रशासन आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार आहे.असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.म्हणून जे एन पि टी प्रशासन यांनी स्वर्गीय कमलाकर विठल ठाकूर यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व कुटुंब सदस्य यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करून भविष्यातील  या सर्व कुटुंबाची  पालन पोषणची जबाबदारी स्वीकारावी व या दुर्घटनेतील दोषी वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी युवा  सामाजिक संस्था जसखारचे सदस्य अमित ठाकूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here