टीआरएसच संपूर्ण काम पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

0

हैद्राबाद : भाजप आणि टीआरएसवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, “भाजप आणि टीआरएस एकत्र काम करतात. निवडणुकीपूर्वी ते फक्त नाटक करतात. मोदीजी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री फोनवर बोलतात. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री काम करत आहेत. ते म्हणाले, मोदीजी देशाची राजधानी त्यांच्या मित्रांना विकत आहेत. केसीआर जमीन हडप करत आहेत, सिंचन प्रकल्पांचे पैसे हडप करत आहेत. पंतप्रधान आता सिलिंडर आणि पेट्रोल महागाईवर बोलत नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा तेलंगणामध्ये दाखल झाली आहे. मंगळवारी हैदराबादमध्ये (Hyderabad) राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, “आमची यात्रा प्रवास द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. भाजप-आरएसएस द्वेष पसरवण्याचे काम करतात. ते भावाला भावाशी लढवण्याचे काम करत आहेत. यामुळे देश कमजोर होत आहे, मजबूत नाही. कोणतीही शक्ती या यात्रेला रोखू शकत नाही. ही यात्रा हा भारताचा खरा आवाज आहे.”
या सभेत व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मला वाटले की दिल्ली प्रदूषणात देशात पहिल्या क्रमांकावर आहे, पण हैदराबादमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी टीआरएस भाजपला मदत करते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here