उरण दि ६( विठ्ठल ममताबादे ) लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या १९८४ सालच्या जासई येथील शेतकरी लढ्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या ठकुबाई शांताराम घरत यांचे सोमवारी ( दि३) वुध्दपकाळांनी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.कामगार नेते रवि घरत यांच्या त्या मातोश्री होत्या.
अत्यंत शिस्तबद्ध,शांत मनमिळाऊ स्वभावाच्या असणाऱ्या ठकुबाई शांताराम घरत यांनी जासई येथील शेतकरी लढ्यात हिरीरीने सहभाग घेतला होता.अशा लढवय्या ठकुबाई घरत यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जासई येथील स्मशानभूमीत ठकुबाई घरत यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.ठकुबाई घरत यांना चार मुले व एक मुलगी आहे.कामगार नेते रवि घरत यांच्या त्या मातोश्री आहेत.तसेच माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ मिनाक्षी मेघनाथ तांडेल यांच्या त्या मातोश्री आहेत.त्याचा दशक्रिया विधी व तेरावा जासई येथील राहत्या घरी पार पडणार आहे.